1 min read

झेप साहित्य संमेलन स्वागत अध्यक्षपदी डॉ. बी. जी.गायकवाड

Loading

झेप साहित्य संमेलन स्वागतlध्यक्षपदी डॉ. बी. जी.गायकवाड

औरंगाबाद: येथून जवळच असलेल्या वाळूज येथे २५ डिसेंबर २०२२, रविवार या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनच्या स्वागताध्यक्षपदी संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव सुप्रसिद्ध लेखक डॉ. बी. जी. गायकवाड यांची घोषणा संयोजक डी.एन. जाधव यांनी केली. त्यांना झेप साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्या संदर्भाचे पत्र साहित्यिक डॉ ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. डॉ.बी.जी. गायकवाड यांचे अश्रूग्रंथ, कॉलेजच्या कविता,जग जिंका, आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मराठवाडा अध्यक्ष,अल्पसंख्यांक संस्थाचालक संघटना प्रदेश सचिव,mupta शिक्षक संघटना मराठवाडा सचिव,शालीवहन पतसंस्था संचालक,नंदीग्राम मित्र मंडळ कार्याध्यक्ष ,महाराष्ट्र चित्रपट महामंडळ जिल्हाध्यक्ष आदी पदं ते सध्या भुषवित आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनात कवि संमेलनाध्यक्ष पद भूषवून उत्कृष्ट कविता सादर केल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रातून सातत्याने त्यांचे लेख व कविता प्रसिद्ध होत आहेत.बी.जी.गायकवाड सराची निवड झाल्याबद्दल स्वराज्य देशा संचालक &महाराष्ट्र चित्रपट महामंडळ च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *