1 min read

कल्याण येथे जिल्हा स्तरीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न.. सर्वोत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा माळी हे तन-मन-धनाने खेळाडूंसाठी झटणारे हाडाचे खेळाडू आहेत:: स्नेहा करपे यांचे प्रतिपादन.. ठाणे कल्याण

Loading

कल्याण येथे जिल्हा स्तरीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न.. सर्वोत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा माळी हे तन-मन-धनाने खेळाडूंसाठी झटणारे हाडाचे खेळाडू आहेत:: स्नेहा करपे यांचे प्रतिपादन.. ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी)::: निळा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका सांस्कृतिक विभाग आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा कल्याण डोंबिवली क्रीडा समिती सदस्य व उत्कृष्ट क्रीडा संघटक कृष्णा माळी यांच्या स्वमालकीच्या सावळाराम फिल्ड ( टर्फ )ग्राउंड मध्ये आज महानगरपालिका सहायक उपायुक्त नोडल ऑफिसर स्नेहा करपे यांच्या हस्ते डॉजबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉजबॉल खेळाचे प्रमुख कृष्णा माळी, श्री. वाणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गजानन वाघ, श्रीमती लता पाचपोर, डॉजबॉल क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सदाशिव पाचपोर, अग्रवाल महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर विजयसिंह सर, बिर्ला महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर यज्ञेश्वर बारगाव , आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेमध्ये 17 वर्ष व 19 वर्षाखालील 45 शाळांमधील संघातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. खेळाडूंना मार्गदर्शन करताना नोडल ऑफिसर स्नेहा करपे यांनी प्रथम त्यांनी क्रिडा समिती सदस्य कृष्णा माळी यांचे धन्यवाद व्यक्त करत सांगितले की अतिशय सुसज्ज असे क्रीडांगण स्वतःच्या मालकीचे क्रीडांगण जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मोफत उपलब्ध करून दिले म्हणून अभिनंदन केले. डॉजबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहिंदरसिंग काबुल सिंग विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक दशरथ आगवणे, विद्यानिकेतन विद्यालयाचे बारवे सर, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे लजपत जाधव , सदाशिव पाचपोर ,सपकाळे सर यांनी ऑफिशियल पंच म्हणून परिश्रम घेतले. आजच्या स्पर्धेत गुरुनानक हायस्कूल कल्याण पश्चिम च्या , दोन्ही अंडर 19 मुलीं व,19 वर्ष गटातील मुलांनी विजय मिळवत मुंबई विभागीय स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नेतृत्व करणारा संघ म्हणून सन्मान मिळवला आहे. अंडर 19 मध्ये मुलांमध्ये मॉडेल कॉलेज डोंबिवली व मुलींमध्ये होली क्रॉस हायस्कूल कल्याण हे संघ उपविजेते ठरले आहेत. अंडर 17 मध्ये शंकरा माध्यमिक विद्यालय डोंबिवली चा संघाने विजय संपादन केला. असून स्वामी विवेकानंद विद्यालय विष्णू नगर डोंबिवली आज संघ उपविजेता ठरला आहे.मुलींमध्ये विद्यानिकेतन विद्यालय डोंबिवली मुलींच्या संघाने विजय संपादन केला आहे,तर स्वामी विवेकानंद विष्णू नगर मुलींच्या संघ उपविजेता ठरला आहे .विजयी संघ मुंबई विभागात खेळताना कल्यान डोंबिवली महानगरपालिका जिल्ह्याचे संघ म्हणून नेतृत्व करतील. विजयी संघांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांनी अभिनंदन करताना शुभेच्छा ही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *