के..सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन.
![]()


के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन.
जळगांव: जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त के.सी.ई.सोसायटीच्या मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे कला मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्री.हेमंत पिंपळे यांनी विद्यार्थ्यांना एड्स रोगाविषयी समाजात असलेले समज- गैरसमज, कारणे,उपाययोजना तसेच वैद्यकीय क्षेत्रात एड्स निर्मूलनाचे कार्य करीत असलेल्या विविध सेवाभावी संस्थांच्या योगदानाविषयी व रेड रिबन एक्सप्रेस संदर्भात विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती प्रदान केली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.श्रीमती के.जी. सपकाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कला मंडळाचे अध्यक्ष प्रा.श्री.अतुल इंगळे यांनी केले. याप्रसंगी तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक- प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री.उमेश पाटील, प्रा.श्री.प्रसाद देसाई, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

