एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार.
![]()

एसटी डेपोतील लेखाकार भगवान महाजन यांना सेवापूर्ती निमित्ताने त्यांचा सत्कार.
अमळनेर प्रतिनिधी
निवृत्ती असे सदाची, तो भाग नोकरीचा
गुंतू नको कधीही, तो मोह सोड आता…
“निवृत्तीनंतर म्हाताऱ्या सारखे न जगता ‘ यंग सीनियर्स’ समजून जगा..
भगवान चिंधू महाजन यांच्या निरोपप्रसंगी सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन..”
अमळनेर एसटी डेपोतील लेखाकार भगवान चिंधू महाजन हे सेवेतून निवृत्त झाले.. त्यांच्या निरोपाप्रसंगी अध्यक्षस्थानी अमळनेर आगाराचे व्यवस्थापक, इम्रान पठाण, हे होते.. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक माधवराव देवधर ,सेवानिवृत्त तहसीलदार सुदाम महाजन हे उपस्थित होते..
सेवानिवृत्तीनंतर म्हाताऱ्यासारखं किंवा ज्येष्ठ नागरिकांसारखं न जगता “यंग सीनियर्स” या संकल्पनेनुसार स्वतःच्या मनाला आणि शरीराला तरुण ठेवून जर जगलात तर निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखावह होते.. असे सुदाम महाजन यांनी नमूद केले..
ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरावरील केस जोपर्यंत आहेत तोपर्यंत तो पैसे देऊन केस कापून घेणार आहे, त्याप्रमाणे जोपर्यंत मानवाच्या रक्तात पर्यटन आणि कामानिमित्त प्रवास करणे आहे.. तोपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मरण नाही.. असे प्रतिपादन देवधर साहेब यांनी केले..
निरोपाला उत्तर देताना भगवान महाजन म्हणाले, गेल्या 39 वर्षापासून माझा एसटी महामंडळाशी ऋणानुबंध आहे.. तसेच माझे वडील देखील एसटी महामंडळात ड्रायव्हर पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेऊन निवृत्त झाले.. याचाच अर्थ माझ्या जन्मापूर्वीपासून माझ्या रक्तात एसटी आहे.. एसटीने माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या विकास केला.. मी यापुढेही महामंडळाने मला हाक दिल्यास मी विना तक्रार माझी सेवा द्यावयास तयार आहे..
निरोपाला उत्तर देताना ते भावूक झालेत आणि त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले..
याप्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एल टी पाटील, आगार अध्यक्ष संजय मोरे, इतर कार्यालयीन कर्मचारी, वाहक, चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
प्रमोद बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले..
.

