राजभाषा हिंदी दिवस समारोह प्रताप महाविद्यालयात संपन्न**

● अमळनेर प्रतिनिधी : प्रताप महाविद्यालय येथे हिंदी विभाग व बँक ऑफ बडोदा च्या संयुक्त विद्यमाने हिंदी राजभाषा हिंदी दिवसाचे यशस्वी आयोजन करन्यात आले .कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे शंभर विद्यार्थी या आयोजनात सहभागी झालेत
.प्रा.डॉ.भगवान भालेराव ,प्रा.डॉ.रवि बालसकर यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी बँक ऑफ बडोदा चे मुख्य प्रबंधक मा.श्री.अनामलामूरी सैंदूलू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पारितोषिक वितरण प्रसंगी प्रताप महाविद्यालय चे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. हर्षवर्धन जाधव , उप प्राचार्या प्रो.डॉ.कल्पना पाटील,उप प्राचार्य अशोक पाटील, उप प्राचार्य श्री.व्ही बी मांटे, हिंदी विभागाध्यक्ष प्रो. डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’, प्रो. कुबेर कुमावत, प्रा.शालिनी पवार, प्रा. देवेंद्र वानखेडे,सहा.प्रा. के.पी.बागुल, सहा.प्रा.किशोर सोनवणे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय मा. हिंदी विभागाध्यक्ष शशिकांत सोनवणे ‘सावन’ यांनी करताना, राजभाषा हिंदीचे वर्तमान स्थान, रोजगार व नौकरी या बाबत माहिती विषद केली ,तर आभार प्रकटन कुबेर कुमावत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.पी.बागुल यांनी केले.
स्नातक स्नातकोत्तर हिंदी विभागामार्फत हिंदी राजभाषा हिंदी दिवसा निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विशेष करून सामान्य ज्ञान स्पर्धा, वक्तृत्व (आशु भाषण) स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात विशेष प्रविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी बँक ऑफ बडोदा ने आर्थिक सहाय्य दिले. ही स्पर्धा तीन स्तरात घेण्यात आली. कनिष्ठ स्तर (11वी व 12 वी ) वरिष्ठ स्तर (पदवी अभ्यासक्रम) व तिसरा स्तर (पदव्युत्तर अभ्यास क्रम) अशी विभागणी करण्यात आली होती.
*यशस्वी विद्यार्थी*
वक्तृत्व स्पर्धेत विशेष प्रविण्य मिळविलेले विद्यार्थी
कु. मिताली मनोहर पाटील (प्रथम - कनिष्ठ विभाग)
कु. सायली योगराज पाटील (प्रथम - वरिष्ठ विभाग)
कु. अश्विनी आधार महाजन (प्रथम – स्नातकोत्तर वरिष्ठ विभाग) तसेच सामान्य ज्ञान प्रतियोगितेत विशेष प्रविण्य मिळविलेले विद्यार्थी कु. वंशिका भिका स्वामी (प्रथम - कनिष्ठ विभाग)
मा. स्वप्निल रविंद्र मोरे (प्रथम - वरिष्ठ विभाग) व मा. ज्ञानेश्वर हिरामण पाटील (प्रथम – स्नातकोत्तर वरिष्ठ विभाग) आहेत.
यावेळी हिंदी विषयातुन पीएच .डी.संशोधन करणाऱ्या श्री. बापू पाटील, मुरलीधर वसावे व सौं.सारिका पाटील या शोधार्थ्यांनी आपल्या स्वच्छेने हिंदी विभागाला स्वयंचलित संयंत्र व विद्युत संरक्षित विजेरी (इनवर्टर व बैटरी)भेट दिली. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यायातील विद्यार्थी व प्राध्यापक अधिक संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे समापन सामूहिक राष्ट्र गीत गायनाने झाले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
एका चिमुकल्या जीवासाठी माणुसकीचा हात पुढे करूया… अन्वीला उपच...
अमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद ...
लोकमान्य टिळकांचा शैक्षणिक राष्ट्रवाद म्हणजे मेंदूच्या स्वात...
अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्व...
आपत्ती व्यवस्थापनाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व - श्...