Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
खान्देश

माहिती अधिकार दिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजागृती

ईश्वर रामदास महाजन 28 Sep 2026, 10:39 986 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:42 3 min read
🔧 साधने:
माहिती अधिकार दिनानिमित्त महात्मा फुले हायस्कूल मध्ये जनजागृती

अमळनेर प्रतिनिधी

देवगाव, ता. अमळनेर : महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव येथे २८ सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते, तर प्रमुख अतिथी म्हणून एच. ओ. माळी उपस्थित होते.

यावेळी शाळेचे सांस्कृतिक प्रतिनिधी आय. आर. महाजन यांनी माहिती अधिकार दिनाचे महत्त्व आणि माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, २८ सप्टेंबर हा जागतिक माहिती अधिकार दिन नागरिकांना माहिती जाणून घेण्याच्या अधिकाराची तसेच पारदर्शक प्रशासनाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे. माहितीचा अधिकार हा केवळ कागदावरील कायदा नसून लोकशाही अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्याचे प्रभावी माध्यम आहे.

शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांना माहिती उपलब्ध झाल्याने प्रश्न विचारण्याची, योग्य माहितीच्या आधारे भूमिका मांडण्याची आणि सार्वजनिक कामकाजावर लक्ष ठेवण्याची संधी मिळते. भारतात माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ लागू झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्या हातात प्रशासनाकडून माहिती मागण्याचे कायदेशीर माध्यम उपलब्ध झाले. मात्र या अधिकाराचा वापर जबाबदारीने, कायदेशीर चौकटीत आणि जनहिताच्या दृष्टीने करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे आभार स्काऊट शिक्षक एच. ओ. माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची अंमळनेर काँग्रेसची मागणी एस.आय.आर. प्रक्रियेवर आक्षेप; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत घोषणाबाजी पुढील बातमी →मुक्ताई ही महिलांची चळवळ जागतिक चळवळ बनली पाहिजे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांचे प्रतिपादन, मुक्ताई सेवादूत च्या सेवाभावी उपक्रमाची जलोषात सुरुवात

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!