Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
महाराष्ट्र

भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे

ईश्वर रामदास महाजन 25 Sep 2026, 15:01 413 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:42 7 min read
🔧 साधने:
भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न  युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे

भुसावळ प्रतिनिधी : सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व नगरपरिषद, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुकास्तरीय शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ येथे करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बियाणी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बियाणी अध्यक्षस्थानी होते. माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका क्रीडा अधिकारी डॉ. नितीन जंगम, मनीष बियाणी, बियाणी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, प्रा. मनोज वारके, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – अभिषेक चावरे

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे म्हणाले, “आजच्या काळात खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नसून त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहून नियमितपणे मैदानावर खेळले पाहिजे. फुटबॉलसारख्या खेळातून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. ग्रामीण व तालुका स्तरावरूनच अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. त्यामुळे युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहून मेहनत, सातत्य आणि शिस्तीने खेळावे.”

शालेय स्तरावरील अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. विजय-पराजयापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे, उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणे आणि त्यातून अनुभव मिळवणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध वयोगटांत चुरशीच्या लढती

स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. १९ वर्षे मुलांच्या व मुलींच्या वयोगटात नाहाटा कॉलेजने प्रथम क्रमांक, तर अलहिरा उर्दू स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.

१७ वर्षे मुलांच्या वयोगटात सेंट अलॉयसेस स्कूल, भुसावळने प्रथम, तर ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळने द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलींच्या गटात ताप्ती पब्लिक स्कूलने प्रथम, तर डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.

१४ वर्षे मुलांच्या वयोगटात सेंट अलॉयसेस स्कूलने प्रथम, तर ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ प्रथम, तर बियाणी मिलिटरी स्कूल द्वितीय ठरले.

स्पर्धेदरम्यान विविध वयोगटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मैदानावर चुरशीच्या लढती दिल्या. संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळाडूंनी कौशल्य, वेग, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडविले. त्यामुळे मैदानावर खेळाडूंसह प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला.

पंचांनी बजावली महत्त्वाची भूमिका

स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरहान शेख, सिद्धेश नरवाडे, मुजमिल शेख, माविया कुरैशी, चेतन बडगे, ॲलिस्टर सिमन्स, सुमित दासगुप्ता, अर्जुन सणस, तोसिफ कुरैशी, याकूब शेख आदींनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी मिलिटरी स्कूल, भुसावळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शालेय स्तरावर फुटबॉलसारख्या खेळांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात भुसावळ तालुक्यातून अनेक गुणवंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर घडण्यास निश्चितच मदत होणार आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; लिनेस क्लब अमळनेरतर्फे स्कूल बॅग व खाऊचे वाटप पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सामाजिक उपक्रम; ITI विद्यार्थ्यांनाही अल्पोपहाराचे वाटप पुढील बातमी →नारळात दिसले गणरायाचे मुख! भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनावेळी भक्तिमय वातावरण

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!