Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

सुरेश केसरकर यांची केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून नियुक्ती, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी -------------------------------------

ईश्वर रामदास महाजन 24 Oct 2026, 13:43 973 views अपडेटेड 27 Oct 2026, 23:16 7 min read
🔧 साधने:
सुरेश केसरकर यांची केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून नियुक्ती,    राज्य गुणवंत कामगार असोसिएशनला दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी  -------------------------------------

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या माध्यमातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून कामगार, कष्टकरी, वंचित, गरजू तसेच समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान देणारे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय संघटन प्रमुख,पत्रकार मा. सुरेश केसरकर यांच्या समाजाभिमुख भरीव कार्याची दखल घेऊन, भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे नूतन चेअरमन नितीन केंजळे व पुणे तसेच गोवा विभागाच्या प्रमुख अरुणा वाघ मॅडम यांच्या उपस्थितीत केंद्रीय श्रमिक बोर्डाच्या विभागीय कार्यालयात, नूतन कार्यकारीणीची पहिली बैठक पार पडली. यावेळी पुणे विभागातील संबंधित पात्र कामगारांना लाभ मिळणेकामी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणेबाबत सकारात्मक चर्चा करणेत आल्या.

या कार्यालयाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगार, शेतमजूर कामगार, अल्पभूधारक, साखर कारखाने तसेच महिला उपसा कामगार अशा विविध क्षेत्रातील कामगारांसाठी विविध उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून, संबंधित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते.

सुरेश केसरकर यांच्या सातत्यपूर्ण कामगारभिमुख व समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन झालेली ही नियुक्ती, त्यांच्या सातत्यपूर्वक कार्याचा गौरव मानली जात आहे.

मा. सुरेश केसरकर हे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष असून, त्या माध्यमातून संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवंत कामगारांना योग्य प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत.

समाजातील सर्व घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, कामगारांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

कामगारांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी श्रमिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागांतर्गत कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून मिळालेली जबाबदारी, संघटीत तसेच असंघटीत तसेच दुर्लक्षीत कामगारांच्या समस्या, अपेक्षा आणि कल्याणकारी उपक्रमांना अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कामगार चळवळ, सामाजिक क्षेत्र आणि गुणवंत कामगारांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळण्याची आशा विविध घटकांतून व्यक्त होत आहे.

*महाराष्ट्रातील गुणवंत कामगारांचा सन्मान*

दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं शिक्षा बोर्डावर सल्लागार म्हणून सुरेश केसरकर यांची झालेली नियुक्ती म्हणजे वैयक्तिक सन्मान नसून, महाराष्ट्रातील सर्वच गुणवंत कामगारांचा सन्मान असून सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची श्रमिक बोर्डाने दखल असल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे.

या नियुक्तीसाठी पुणे व गोवा विभागाच्या दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं एज्यूकेशन बोर्डाच्या प्रमुख मा. अरुणा वाघ मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

मा. सुरेश केसरकर यांच्या या निवडीच्या अनुषंगाने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला - क्रिडा, सेवाभावी संस्था तसेच औद्योगिक क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून, त्यांच्या पुढील उज्वल कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअमळनेर मतदारसंघात आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शेतपाणंद रस्त्यांच्या विकासाला गती..! १३ गावांतील शेतशिवार रस्त्यांचे भूमिपूजन; एकूण ९,५७६ मीटर लांबीच्या रस्त्यांची कामे मार्गी, मा.जि. प. सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न; पुढील बातमी →तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटात अनिल पाटील द्वितीय

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!