Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

श्री मंगळग्रह मंदिरात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन

ईश्वर रामदास महाजन 21 Oct 2026, 15:31 995 views अपडेटेड 25 Oct 2026, 00:43 4 min read
🔧 साधने:
श्री मंगळग्रह मंदिरात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन

श्री मंगळग्रह मंदिरात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन

अमळनेर प्रतिनिधी: विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी हा कार्यक्रम पार पडला.

अमळनेर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिका री विनायक कोते, अँड व्हि. आर. पाटील त्यांच्या धर्मपत्नी सौ. स्वातीताई पाटील हे शस्त्रपूजनाचे मानकरी होते. सुरूवातीला त्यांच्या शुभहस्ते विधिवत मंत्रोच्चारात संकल्प करण्यात आला. त्यानंतर गणपती पूजन, विश्वकर्मा स्मरण, तसेच प्रधान देवता मंगळग्रह देवाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन विधी पार पडला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी व वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले.

याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिराव, मंगल सेवेकरी श्री. आर. टी. पाटील, श्री. प्रकाश मेखा, श्री. व्ही. व्ही. कुळकर्णी, श्री. पुषंद ढाके, श्री.आशिष चौधरी, मेजर राजेंद्र यादव मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी भरत पाटील, शरद कुलकर्णी यांच्यासह मंदिर परिसरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शस्त्रपूजा का करतात ?

पूर्वी राजे - महाराजांच्या काळात विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा केली जात असे. शस्त्रे धैर्य, शौर्य व संरक्षणाचे प्रतिक मानले जातात. शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतिक मानून राज्यांच्या सिमा ओलांडत कूच करत असत. यादिवशी केलेली पूजा विजय, धैर्य, यश आणि समृद्धी प्रदान करते, अशी मान्यता होती. ती आजही कायम आहे.

फोटो कँप्शन

अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवार, दि. 20 रोजी विजयादशमीनिमित्त विधिवत शस्त्रपूजन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, ॲड. व्ही. आर. पाटील, सौ. स्वातीताई पाटील यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी व भाविक. (छायाचित्र : मयूर चौधरी)

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमंगळग्रह मंदिरात अत्याधुनिक वीजरोधक यंत्रणेची स्थापना , ‌‘एपीएपीएल‌’कडून 12 मीटर उंचीवर यंत्रणा कार्यान्वित; 2 ते 5 किलोमीटरपर्यंत संरक्षण क्षमता पुढील बातमी →आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव करून देणारे प्रा. वसंत हंकारे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान , शिंदखेड्यात ‘न समजलेले माय-बाप’ विषयाने तीन हजार विद्यार्थी व पालक भावूक; विद्यार्थिनींनी वडिलांना मिठी मारत व्यक्त केल्या भावना

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!