सेवा संकल्प अभियानांतर्गत नोबल इंटरनॅशनल स्कूल व सूर्या फाउंडेशनतर्फे मोफत हेल्मेट वाटप आणि नवरात्रीनिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

पाळधी, दि. १७ ऑक्टोबर २०२६ : सूर्या फाउंडेशन व नोबल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा अभियानासाठी मोफत हेल्मेट वाटप समारंभ तसेच नवरात्रीनिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व प्रसन्न वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाहतूक पोलीस शाखेचे श्री. निलेशकुमार संदानशिव साहेब होते. यावेळी केंद्रप्रमुख श्री. प्रदीप जाधव सर, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद भाऊ नन्नवरे, सौ. संगीताताई कासट, श्री. अनिलभाई कासट, सामाजिक कार्यकर्ते दीपक परदेशी, धरणगावचे तहसीलदार श्री. महेंद्र सोनवणे तसेच चांडक हॉस्पिटलचे सर्वेसर्वा श्री. निलेशजी चांडक सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पाळधी परिसरातील पत्रकार बांधवही उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मान्यवरांच्या हस्ते पालकांना व विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सूर्या फाउंडेशनच्या सेवा संकल्प अभियानातून समाजात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सूर्या फाउंडेशनतर्फे नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजाच्या आरोग्य, बालसंगोपन आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविकांचा साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवाकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. तसेच कुमारी पूजन करून कुमारिकांना भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रसंगी नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना सूर्यवंशी मॅडम, ह्यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने पालक वर्ग व अंगणवाडी सेविका उवस्थित होते डायरेक्टर श्री. प्रशांत सूर्यवंशी सर, ह्यानि पालकांना हेल्मेट वापरण्याचे आव्हान केले कार्यक्रमासाठी अंकुर सर, जोशी मॅडम, बाहेती मॅडम, अत्तरदे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ह्यांनी मेहनत घेतली चालक आणि पालक सहभागी झाले होते.
रस्ता सुरक्षा, नारीशक्तीचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेला हा उपक्रम सूर्या फाउंडेशन व नोबल इंटरनॅशनल स्कूल यांच्या सामाजिक कार्याची जाणीव करून देणारा ठरला. समाजहिताचे उपक्रम राबवून जनजागृती आणि सेवाभाव जोपासण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...