Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

गरिबांच्या ‘मसिहा’वर गोळीबार; राणा सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याने महाराष्ट्र हळहळला!* *पोलिसांसमोर गोळीबार; पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू, राणा यांची प्रकृती चिंताजनक.*

ईश्वर रामदास महाजन 19 Oct 2026, 01:08 1.2K views अपडेटेड 27 Oct 2026, 18:21 9 min read
🔧 साधने:
गरिबांच्या ‘मसिहा’वर गोळीबार; राणा सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याने महाराष्ट्र हळहळला!*    *पोलिसांसमोर गोळीबार; पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू, राणा यांची प्रकृती चिंताजनक.*

*गरिबांच्या ‘मसिहा’वर गोळीबार; राणा सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याने महाराष्ट्र हळहळला!*

*पोलिसांसमोर गोळीबार; पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू, राणा यांची प्रकृती चिंताजनक.*

*पुणे : गरिबांचा वाली, गरजवंतांचा आधार आणि सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केलेले उद्योजक राणा सुर्यवंशी यांच्यावर बारामती येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. हल्ल्याचे स्वरूप, हल्लेखोरांचे धाडस आणि या घटनेमागील नेमके कारण याबाबत विविध स्तरांतून चिंता व्यक्त केली जात आहे.*

*बारामती येथे राणा सुर्यवंशी यांच्यावर धारदार शस्त्रे आणि बंदुकीचा वापर करून हल्ला करण्यात आला. यात त्यांना दोन्ही हातावर आणि पोटाला गंभीर दुखापत झाली. पोलिसांसमोर हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही चर्चेत आला आहे. राणा सुर्यवंशी यांची ओळख केवळ उद्योजक म्हणून मर्यादित नसून, सामाजिक कार्यात सक्रिय असलेली व्यक्ती म्हणूनही आहे. त्यातूनच त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार आणि अनेक पत्रकार संघटनांनी एकत्रित येवून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते, तर केंद्र सरकार आणि अनेक पत्रकार संघटनांनी एकत्रित येवून त्यांना महाराष्ट्र उद्योजक रत्न पुरस्काराने *गौरविण्यात आले होते. सामाजिक कार्यासाठी त्यांच्या नावे अनेक नोंदी आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागांमध्ये त्यांनी गेल्या १५ वर्षांत धान्यवाटपाचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात प्रचंड मोठी सेवा राणा यांनी उभी केली आहे.*

*गरजू कुटुंबांना मदत करणे, अडचणीच्या काळात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे, या कामांमुळे अनेक भागांत राणा यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.*

*हल्ल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक राणा सुर्यवंशी हे उपचारासाठी बारामती येथे उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते म्हणून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुणे येथे हलवण्यात आले. त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापती झाल्याची माहिती रुबीतील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. चार दिवसांनंतर तब्बेतीवर भाष्य करता येईल असेही डॉक्टर म्हणाले. राणा यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.*

*त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी समर्थक आणि परिचितांकडून प्रार्थना केली जात आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर रात्रीच रुबी रुग्णालयाबाहेर हजारो नागरिकांनी राणा यांना भेटण्यासाठी रात्री गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशी ही गर्दी कायम होती.*

*राणा सुर्यवंशी यांचे विविध क्षेत्रांतील व्यावसायिक संबंध आणि राजकीय वर्तुळातील संपर्क यांची चर्चा होत असली, तरी या हल्ल्यामागे राजकीय किंवा व्यावसायिक वैमनस्य नेमके कारण काय हे तपासातून पुढे येईल. हल्लेखोर कोण होते, हल्ला करण्यामागील उद्देश काय होता आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून होणे आवश्यक आहे. या घटनेवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे, संजय राऊत यासह अनेक राजकीय नेत्यांनी राणा हल्ला प्रकरणावर भाष्य करत सरकारला धारेवर धरले आहे.*

*एखाद्या व्यक्तीने सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांशी नाते निर्माण केले असेल, तर तिच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अनेकांना अस्वस्थ करते. राणा सुर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याच्या वृत्तामुळेही त्यांच्या परिचितांमध्ये, समर्थकांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.या प्रकरणात हल्लेखोरांना तातडीने अटक व्हावी, हल्ल्यामागील सत्य समोर यावे आणि कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.*

*उद्योजक राणा सुर्यवंशी यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचे बारामतीचे पोलिस उपअधीक्षक चैतन्य कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कदम म्हणाले, राणा सुर्यवंशी यांच्यासोबत चार पोलिस कर्मचारी उपस्थित असतानाही हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.*

*हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र ते पसार झाले. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात असल्याचे कदम यांनी सांगितले.*

*अनेक पोलिस कर्मचारी उपस्थित असतानाही हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरदिवसा किंवा पोलिसांच्या उपस्थितीत अशा प्रकारची घटना घडणे ही निश्चितच गंभीर बाब आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करून हल्ल्यामागील कारण उघड करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.*

————

*फोटो ओळ : राणा सुर्यवंशी यांच्या एका हाताला बंदुकीची गोळी घासून गेल्याने गंभीर जखम झाली असून, दुसऱ्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे. हल्ल्यातील दोन्ही हातांच्या गंभीर जखमा हल्ल्याची भीषणता दर्शवतात. राणा यांच्या पोटाला ही मोठा मार लागला आहे.*

——-

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीहिंदी अध्यापक मंडळाच्या सहविचार सभेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाचे नियोजन , हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेला ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दिवाळीनंतर बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन पुढील बातमी →सेवा संकल्प अभियानांतर्गत नोबल इंटरनॅशनल स्कूल व सूर्या फाउंडेशनतर्फे मोफत हेल्मेट वाटप आणि नवरात्रीनिमित्त नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!