Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’-म्हणजे ग्रामीण जीवन व समाजभान जोपासणा-या सर्वांगसुंदर कलाकृती'* *(प्रा.डॉ.दशरथ साळुंखे लिखित नवनिर्मित काव्यसंग्रह परीक्षण)*

ईश्वर रामदास महाजन 18 Oct 2026, 08:02 1K views अपडेटेड 22 Oct 2026, 00:37 14 min read
🔧 साधने:
गाव-शिवारातल्या कविता’ आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’-म्हणजे ग्रामीण जीवन व समाजभान जोपासणा-या सर्वांगसुंदर कलाकृती'*  *(प्रा.डॉ.दशरथ साळुंखे लिखित नवनिर्मित काव्यसंग्रह परीक्षण)*

मराठी साहित्याला ग्रामीण जीवनाची समृद्ध परंपरा लाभली आहे. संत साहित्यापासून लोकसाहित्या पर्यंत,बहिणाबाईंच्या सहजभाषेपासून आधुनिक ग्रामीण साहित्यात,शेतकरी,श्रमिक,स्त्री,दलित,वंचित,उपेक्षित यांच्या जीवनाला 'शब्द' देणारी मोठी साहित्य परंपरा महाराष्ट्रात आहे.जळगाव आणि खानदेशाची भूमी तर विशेषतः साहित्यिक दृष्ट्या समृद्ध आहे.बहिणाबाईंच्या ओव्या असोत किंवा खानदेशातील लोकजीवन—माती आणि माणूस यांचे अतूट नाते येथे साहित्याने जपले आहे.याच परंपरेत आज प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांचे हे दोन काव्यसंग्रह आपला स्वतंत्र स्वर घेऊन साहित्याच्या भव्य प्रांगणात येत आहेत,ही अत्यंत आनंदाची बाब आहे.

"गाव-शिवारातल्या कविता" आणि "शब्दधन वाटू जनलोका" दोन काव्यसंग्रहांनी संवेदनशील साहित्यविश्वांची दारे उघडली आहोत. पुस्तकांच्या पानांवर अक्षरे उतरली आहेत;त्या अक्षरांच्या मागे मातीचा सुगंध आहे, माणसांचे दुःख आहे,श्रमाचा घाम आहे,गावाकडच्या आठवणी आहेत, सामाजिक वास्तवाचे भान आहे आणि माणूसपण टिकवण्याची तळमळ आहे.‘गाव’ हा शब्द आपण उच्चारतो आणि आपल्या मनात कितीतरी चित्रे एकाच वेळी उभी राहतात. मातीचा रस्ता,शेताच्या बांधावरची हिरवाई,पावसाची पहिली सर,मातीत पाय रोवून उभा असलेला शेतकरी,शेतात राब-राबणारी माय,दुपारच्या उन्हातान्हामध्ये काळवंडलेला,रापलेला,शेतमजूर,विहिरीवरची रहाट, गावच्या मंदिराची घंटा,पारावरची बैठक,जत्रा,पोळा,दिवाळी बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळा आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेला माणूस!पण गाव म्हणजे केवळ रम्य निसर्ग नाही.गाव म्हणजे संघर्षसुद्धा आहे.गाव म्हणजे दुष्काळ आहे.गाव म्हणजे कर्जबाजारीपणा आहे.गाव म्हणजे स्थलांतर आहे.गाव म्हणजे शेतकऱ्याचे अश्रू आहेत.गाव म्हणजे शेतमजुराचा घाम आहे.गाव म्हणजे स्त्रीच्या कष्टांची नोंद नसलेली कहाणी आहे.गाव म्हणजे जात,वर्ग,विषमता, रूढी यांच्याशी झगडणारे वास्तवही आहे.गावाकडे केवळ निसर्गरम्य दृश्य म्हणून पाहणारा कवी आणि गावाच्या अंतरंगात शिरून माणसाचे अंतःकरण शोधणारा कवी यात फार मोठा फरक असतो.

*‘गाव-शिवारातल्या कविता’-* मातीशी नाते सांगणारा काव्यस्वर आहे.या संग्रहाचे नावच खूप बोलके आहे.‘गाव-शिवारातल्या कविता यात! ‘गाव’ आणि ‘शिवार’ या दोन्ही शब्दांमध्ये भारतीय ग्रामीण जीवनाचा संपूर्ण पट सामावलेला आहे. गाव म्हणजे माणसांचे जगणे, आणि शिवार म्हणजे त्या जगण्याला आधार देणारी जमीन.गावात माणूस असतो;शिवारात त्याचा घाम असतो.गावात नाती असतात; शिवारात त्या नात्यांची परीक्षा असते.गावात स्वप्ने असतात; शिवारात त्या स्वप्नांसाठी संघर्ष असतो.म्हणून ‘गाव-शिवारातल्या कविता’ म्हणजे फक्त ग्रामीण कविता नव्हेत.त्या ग्रामीण जीवनाच्या सामाजिक मानसशास्त्राच्या कविता आहेत.या कवितांमध्ये मातीतला सुगंध आहे,पण त्याचबरोबर वास्तवाची धगही आहे.कवितेची खरी ताकद काय?कविता म्हणजे मनुष्याच्या अनुभवाला शब्द देणे.ज्याला बोलता येत नाही, त्याच्या वेदनेला आवाज देणे म्हणजे कविता.ज्याचे दुःख समाजाला दिसत नाही,ते समाजासमोर आणणे म्हणजे कविता.ज्याच्या श्रमाची दखल घेतली जात नाही,त्या श्रमाला प्रतिष्ठा देणे म्हणजे कविता.आज आपण एका अशा काळात जगत आहोत की माहिती भरपूर आहे;पण संवेदना कमी होत चालली आहे.आपल्याकडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहे,कृत्रिम बुद्धिमत्ता आहे,सोशल मीडिया आहे.एका क्षणात जगातील कोणतीही माहिती आपल्या हातात येते.पण प्रश्न असा आहे— माहिती वाढली, पण माणूस वाढला का?ज्ञान वाढले,पण संवेदना वाढली का?तंत्रज्ञान वाढले,पण परस्परांबद्दलची आस्था वाढली का? साहित्य आपल्याला माणूस का जगतो हे सांगते.विज्ञान आपल्याला अवकाशात घेऊन जाते; साहित्य आपल्याला स्वतःच्या अंतर्मनात घेऊन जाते.

*"शब्दधन वाटू जनलोका"*:- शब्दांचे लोकधर्मी रूप असा हा दुसरा काव्यसंग्रह आहे— ‘शब्दधन वाटू जनलोका’ या शीर्षकातच कवीची भूमिका दडलेली आहे.शब्दधन स्वतःजवळ ठेवायचे नाही;तर ते जनतेला वाटायचे आहे.ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.ज्ञान जर फक्त ग्रंथालयात बंद राहिले तर त्याचा समाजाला किती उपयोग?विचार जर फक्त विद्वानांच्या चर्चेत राहिले तर सामान्य माणसाचे काय?साहित्य जर केवळ साहित्यिकांसाठी असेल तर त्याचे सामाजिक प्रयोजन काय? म्हणूनच-शब्दांनी समाजाशी संवाद साधला पाहिजे,शब्दांनी माणसाला माणसाशी जोडले पाहिजे. शब्दांनी अन्यायाला प्रश्न विचारला पाहिजे,आणि शब्दांनी माणसाच्या अंतःकरणात माणूसपण जागे केले पाहिजे.‘शब्दधन वाटू जनलोका’हे शीर्षक मला म्हणूनच साहित्याच्या लोकाभिमुख भूमिकेचे प्रतीक वाटते.म्हणूनच कवीची कविता ही त्याच्या वैयक्तिक भावविश्वाची असली तरी तिच्यामध्ये अनेकांचे जीवन प्रतिबिंबित होत असते. एक कवी लिहितो; पण त्याच्या शब्दांमध्ये हजारो माणसे बोलत असतात.माती आणि माणूस‘ गाव-शिवारातल्या कविता’ या संग्रहाच्या निमित्ताने ‘माती’ आणि ‘माणूस’ यांचे नाते विशेषत्वाने अधोरेखित करावेसे वाटते. आपल्या संस्कृतीत मातीला आई म्हटले जाते.मातीतून अन्न मिळते.मातीतून संस्कृती उगवते.मातीतून स्मृती उगवतात.शेवटी माणूसही मातीतच विलीन होतो.म्हणून मातीशी नाते म्हणजे केवळ शेतीशी नाते नाही.तर ते आपल्या अस्तित्वाशी नाते आहे. ग्रामीण जीवन समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्राचे सामाजिक वास्तव समजणे कठीण आहे.ग्रामीण जीवनाचे हे अनेकविध पदर साहित्याने जपले आहेत.

*शिक्षक आणि कवी :-* दोन भूमिका,एकच ध्येय,प्रा.डॉ.दशरथ साळुंखे यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षक आणि कवी ही त्यांची दुहेरी ओळख.शिक्षक काय करतो? तो विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतो.कवी काय करतो?तो समाजाच्या मनात प्रश्न निर्माण करतो.शिक्षक विद्यार्थ्याला विचार करायला शिकवतो. कवी समाजाला विचार करायला भाग पाडतो. शिक्षक ज्ञान देतो.कवी अनुभवाला अर्थ देतो.म्हणूनच शिक्षक आणि कवी या दोन्ही भूमिका मूलतः मानवी मन घडविणाऱ्या भूमिका आहेत. मला असे वाटते.वर्गखोलीत शिकवणारा शिक्षक जेव्हा समाजाकडे संवेदनशील नजरेने पाहतो,तेव्हा त्याच्या हातून निर्माण होणारे साहित्य अधिक जीवनस्पर्शी होते. पुस्तकातील एक शब्द मनात आयुष्यभर राहतो. सोशल मीडियावर हजारो संदेश येतात; पण एखादी कविता मनात एक प्रश्न निर्माण करते.म्हणून विद्यार्थ्यांना आपण केवळ तंत्रज्ञान देऊन चालणार नाही.त्यांना विचार, विवेक,संवेदना आणि मूल्ये द्यावी लागतील.यासाठी साहित्य अत्यंत प्रभावी माध्यम आहे.साहित्य समाजाला आरसा दाखवते.साहित्याचे एक मोठे कार्य म्हणजे समाजाला त्याचा आरसा दाखवणे.आरशाचे काम चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहरा बदलणे नाही. आरशाचे काम सत्य दाखवणे आहे. तसेच साहित्याचे कामही समाजाला त्याचे खरे रूप दाखवणे आहे.ज्या साहित्याला समाजाचे दुःख दिसत नाही ते साहित्य कितीही सुंदर असले तरी अपुरे आहे.

*कविता म्हणजे आशेचा किरण*- परंतु साहित्याने केवळ दुःख मांडायचे नसते.दुःखाच्या अंधारातून आशेचा किरणही दाखवायचा असतो.कवितेने निराशेला अर्थ द्यायचा असतो. संघर्षाला शक्ती द्यायची असते.पराभवातही उभे राहण्याची प्रेरणा द्यायची असते.मला वाटते-चांगली कविता आपल्याला रडवतेही आणि लढायलाही शिकवते.ती मनाला हळवे करते आणि विवेकालाही जागे करते.

*दोन संग्रह : दोन प्रवाह-*

मला या दोन काव्यसंग्रहांकडे एका प्रतीकात्मक दृष्टीने पाहावेसे वाटते.‘गाव-शिवारातल्या कविता’ म्हणजे मातीपासून माणसापर्यंत जाणारा प्रवास.आणि ‘शब्दधन वाटू जनलोका’ म्हणजे माणसापासून समाजापर्यंत जाणारा प्रवास.पहिल्या संग्रहात माती बोलते.दुसऱ्या संग्रहात शब्द समाजाशी संवाद साधतात.पहिल्या संग्रहात गाव दिसते.दुसऱ्या संग्रहात जनजीवनाशी नाते दिसते. ही दोन पुस्तके म्हणूनच एका व्यापक साहित्यिक जाणिवेची दोन रूपे आहेत,असे मला वाटते.

प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांनी या दोन काव्यसंग्रहांच्या माध्यमातून आपल्या साहित्यिक प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. *शब्द असावेत प्रेमाचे!*- ‘गाव-शिवारातल्या कविता’ मधून मातीचा सुगंध दरवळत राहो.‘शब्दधन वाट जनलोका’ मधून माणुसकीचा संदेश जनमानसात पोहोचत राहो.प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या लेखणीला अधिकाधिक बळ लाभो.प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या साहित्यिक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!

शब्दाकंन

-प्रा.डॉ.साहेबराव सत्यभामा त्र्यंबकराव भुकन.

(मा.अधिष्ठाता शिक्षणशास्र विद्याशाखा,क.ब.चौधरी उ.म.वि.जळगाव.तथा

सानेगुरूजी विद्या प्रबोधनीचे, शिक्षणशास्र महाविद्यालय,खिरोदा ता.रावेर जि.जळगाव)

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीनाना गेले, मनामनांत घर करून !* *हेमंत पाटील यांच्या लेखणीतून नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा* पुढील बातमी →अमळनेरचे उपक्रमशील शिक्षक पवन पाटील यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!