Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार! , अमळनेरच्या महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन; हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी अनुदानाची मागणी, एस.आय.आर. रद्द करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

ईश्वर रामदास महाजन 15 Oct 2026, 09:56 1.2K views अपडेटेड 27 Oct 2026, 15:36 9 min read
🔧 साधने:
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार!   , अमळनेरच्या महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन; हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी अनुदानाची मागणी, एस.आय.आर. रद्द करण्यासह मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, महागाईने सर्वसामान्य त्रस्त, बेरोजगारीने तरुण हतबल आणि कथित राजकीय हस्तक्षेपामुळे लोकशाहीसमोरील आव्हाने गंभीर होत असल्याचा आरोप करत अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी महाराणा प्रताप चौकात जनआंदोलन छेडले. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एस.आय.आर.) प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशा विविध मागण्यांनी आंदोलनादरम्यान जोर धरला. शासनाच्या धोरणांवर टीकेची झोड उठवत आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.

दुष्काळी मदत कुठे? शेतकऱ्यांचा सवाल ऐरणीवर

महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अमळनेर तालुक्यातील शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे जगणे कठीण झाले असताना राज्य शासनाकडून अपेक्षित दुष्काळी मदत मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संकटग्रस्त शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांवर न ठेवता प्रत्यक्ष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी आंदोलनस्थळी भाषण करताना दुष्काळी अनुदानापोटी प्रति हेक्टर एक लाख रुपये देण्याची मागणी केली. स्थानिक आमदार, खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन मदतीचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली.

एस.आय.आर. प्रक्रियेवर आक्षेप; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एस.आय.आर.) प्रक्रियेमुळे मतदार त्रस्त असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारांकडून सरकारी यंत्रणांचा पक्षीय व वैयक्तिक फायद्यासाठी वापर होत असल्याचा दावा करत आंदोलकांनी निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या हिताला पूरक निर्णय घेतल्याचा आरोपही वक्त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि एस.आय.आर. प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी मा.आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी केली. या मुद्द्यावरून आंदोलनस्थळी सरकार आणि निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली.

महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटीवरून सरकारला धारेवर

महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून बेरोजगारीमुळे तरुण वर्ग चिंतेत असल्याचा मुद्दा वक्त्यांनी मांडला. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण होत असल्याचे सांगत शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले.

राज्यात सुडाचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही विविध वक्त्यांनी केला. शेतकरी, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी राजकीय संघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

नेत्यांच्या भाषणांतून शासनाच्या धोरणांवर प्रहार

आंदोलनाचे प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) अध्यक्ष डी. एम. पाटील, संदीप घोरपडे, अँड. तिलोत्तमा पाटील, लोटन चौधरी, अँड. शकील काझी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, प्रा. अशोक पवार, शिवसेनेचे निंबा पाटील आणि प्रशांत निकम यांनी आपली भूमिका मांडली.

वक्त्यांनी दुष्काळ, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी आणि निवडणूक प्रक्रियेबाबतचे आक्षेप या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. विविध जनसमस्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; मागण्यांसाठी आंदोलनाचा आवाज

महाराणा प्रताप चौकात ठिय्या आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन दिले. दुष्काळी अनुदान, एस.आय.आर. प्रक्रिया रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागण्यांसह विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गजेंद्र साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि आंदोलनाची सांगता झाली.

बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती

या आंदोलनात मनोज पाटील, धनगर दला पाटील, मगन पाटील, प्रा. श्याम पवार, तुषार संधान शिव, नेहरू पवार, अशोक पवार, चंद्रशेखर भावसार, अँड. कौस्तुभ पाटील, राजेंद्र मराठे, मनीषा परब, पी. वाय. पाटील, राजेंद्र चौधरी, प्रताप पाटील, कन्हैया कापडे, विकास पाटील, रोहिदास कापडे, हर्षल जाधव, ताराचंद सूर्यवंशी, देवेंद्र देशमुख, सईद तेली, सुनिता माने, चंदू वानखेडे, अधिकार पाटील, जुबेर पठाण, अरुण देशमुख, पितांबर पाटील, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ पाटील, दिलीप पाटील आणि अँड. क्रांती ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दुष्काळी मदत, मतदार यादी पुनरीक्षण आणि वाढत्या जनसमस्यांवरून महाविकास आघाडीने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला. आता या मागण्यांवर शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त सरस्वती विद्यामंदिरात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा प्रेरणादायी गोष्टींतून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी; गुलाबाई व दांडिया महोत्सवातील विजेत्यांचा गौरव पुढील बातमी →अमळनेरच्या विकासाला जिल्ह्याचा ‘बूस्टर डोस’! प्रशांत निकम यांचा पुढाकार , ५५ किलोमीटरच्या प्रशासकीय धावपळीला पूर्णविराम देण्याचा संकल्प; स्वतंत्र जिल्ह्यासाठी शासनदरबारी सविस्तर पाठपुरावा करणार

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!