Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा कणा- प्रा.बालाजी चिरडे (वर्धा) यांचे प्रतिपादन

ईश्वर रामदास महाजन 14 Oct 2026, 11:02 1.2K views अपडेटेड 27 Oct 2026, 14:05 7 min read
🔧 साधने:
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा कणा- प्रा.बालाजी चिरडे (वर्धा) यांचे प्रतिपादन

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते १२:३० दरम्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात 'महाराष्ट्रातील वैचारिक परंपरा' या विषवावर प्रा.बालाजी चिरडे (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ,वर्धा) यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.

प्रस्तुत व्याख्यान हे राज्यशास्त्र,अर्थशास्त्र, इतिहास,मराठी,तत्वज्ञान व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

प्रस्तुत समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव हे होते,तर या प्रसंगी विचारमंचावर व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान संस्थेच्या प्राचार्या डॉ.वर्षा पाठक, मराठी विभाग प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर कांबळे,पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.अमित पाटील,प्रा.शिला पाटील मॅडम उपस्थित होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले तर प्रमुख वक्त्याचा परिचय प्रा.संदीप नेरकर यांनी करून दिला.

आपल्या तासभर चाललेल्या व्याख्यानात प्रा.चिरडे म्हणाले की,महाराष्ट्र ही विचारांची माती आहे,या राज्याला समृद्ध करण्यात संत, समाज सुधारक,विविध चळवळी, वैचारिक लढा,सर्व कालखंडातील विचार प्रवाहाचे महत्व,बाळशास्त्री जांभेकर- महात्मा फुले- आगरकर- टिळक-महात्मा गांधी-जवाहरलाल नेहरू-सरदार पटेल-डॉ.आंबेडकर-डॉ.हेडगेवार-प्रबोधनकार ठाकरे-राम मनोहर लोहिया-श्रीपाद अमृत डांगे-राष्टीय स्वयं सेवक संघ-मुस्लिम लीग-हिंदू महासभा हे सर्व विचारप्रवाह आजच्या काळात समजून घेणे आवश्यक आहे.याचप्रमाणे नरहर कुरुंदकर व शेषेराव मोरे यांच्या विचारांची प्रासंगीकता देखिल लक्षात घेणे गरजेचे आहे, या वैचारिक भूमिका अभ्यासणे आणि अंतर्मुख होणे आवश्यक आहे. खरे पाहता १९ शतकात नव्या महाराष्ट्राची जडणघडण झाली ज्यामध्ये उदारमतवादी विचारापासून ते राष्ट्रवादी विचारापर्यंत कशी वाटचाल झाली,सर्व क्षेत्रातील विचार प्रवाहांना समजून घेऊन त्याचा तटस्थपणे परामर्ष प्रा.चिरडे सरांनी घेतला.

डॉ.वर्षा पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,संत ज्ञानेश्वर ते नरहर कुरुंदकर असा वैचारिक प्रवास हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, समाज घडणीत सर्व समाज सुधारकांचे योग्यदान महत्वाचे आहे. पूज्य साने गुरुजी व स.ना.भालेराव यांचे योगदान देखिल स्थानिक ते राष्ट्रीय दृष्टीने खूप महत्वाचे आहे.

यावेळी प्रा.शिला पाटील यांनी पुस्तक वाचन किती महत्वाचे आहे, विद्यार्थ्यांचा बौद्धिक सहभाग हा वैचारिक जडण घडणीत महत्वाचे आहे, असे मत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य हर्षवर्धन जाधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सभागृहात सेवा निवृत्त प्रा.शिवाजीराव सीताराम पाटील,डॉ निलेश चित्ते,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ माधव भुसनर,मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ.रमेश माने, डॉ पुष्पां पाटील,डॉ प्रियंका पाटील,प्रा.योगेश पाटील,डॉ बालाजी कांबळे,डॉ.रविंद्र मराठे,प्रा.सागर सैंदाणे,प्रा.तुषार पाटील याचप्रमाणे अर्थशास्त्र विषयाचे प्रा.मनीषा पारधी,प्रा सोनूसिंग पाटील,प्रा सचिन आवटे,डॉ आकाश गव्हाणे,प्रा भिका पावरा,प्रा हितेश निकुंभे,प्रा प्रणव शिंदे,इतिहास विभागाचे प्रा उमेश पाटील,पदार्थ विज्ञान विभागाचे डॉ संदीप काशिनाथ नेरकर,संरक्षणशास्त्र विषयाचे प्रा विकास मोरे, प्रा.रविंद्र कांबळे,राज्यशास्त्र विभागाचे डॉ सुनिल राजपूत,डॉ राखी घरटे,प्रा निर्भय सोनार,प्रा रुपाली महाजन आदी उपस्थित होते.

प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास पाटील, संदीप सोनवणे,दिलीप शिरसाठ,महेश मोरे,हिमांशू गोसावी,अमोल अहिरे,दिपक चौधरी,कल्याणी महाजन,गायत्री पाटील,पूनम माळी, राहुल ढीवरे, गौरव मेधे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ सुनिल राजपूत यांनी केले तर आभार डॉ राखी घरटे यांनी मानले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीएकाच मंदिरात पाच देवींच्या दर्शनाचा आध्यात्मिक योग! , अमळनेरला श्री मंगळग्रह देवांसोबत श्री भूमीमाता, श्री पार्वती, श्री अनघालक्ष्मी, श्री भैरवी, श्री लक्ष्मी माता यांच्या मूर्ती विराजमान पुढील बातमी →कलेचा रंग कलेचा रंग फिका होतोय; वाचनसंस्कृती हरवतेय! अतुल पेठे यांचा परखड सवाल , ‘जीवनात कला, कलेत जीवन’मधून जगण्याचे मर्म उलगडले; बहिणाबाईंच्या कवितांतून जीवनदर्शन, नाटक आणि संवादाच्या घटत्या प्रभावावर व्यक्त केली खंत होतोय; वाचनसंस्कृती हरवतेय!

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!