Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, ५६ भोग आणि श्री महाभोमयागाचे आयोजन; भाविकांना दर्शन, तीर्थप्रसादाचे निमंत्रण
ईश्वर रामदास महाजन 19 Sep 2026, 14:06 843 views अपडेटेड 20 Oct 2026, 10:48 4 min read
🔧 साधने:
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
थोडक्यातश्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.

अमळनेर प्रतिनिधी: श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने विधीवत साजरा होणार आहे. मंगळग्रह सेवा संस्थेने भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी या अलौकिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिराच्या इतिहासात हा दिवस सर्वांत मोठा आणि परम पवित्र मानला जातो. यानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात अतिशय भक्तिमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरण असणार आहे.

दिवसभरातील कार्यक्रम

पहाटे ४ वाजता श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर वैशिष्ट्यपूर्ण पंचामृत अभिषेकाने या सोहळ्याची सुरूवात होईल. सकाळी ६ वाजता फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देवांचा प्रतिकात्मक जन्मोत्सव साजरा होईल. सकाळी ७ वाजता मंदिरावरील जुने ध्वज विधीवत उतरवून नवे ध्वज लावण्यात येतील. त्यानंतर श्री मंगळग्रह देवांची महाआरती होऊन देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला जाईल. यानंतर दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित असलेल्या समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचेही आयोजन केले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून वाद्यवृंदासह वाजतगाजत पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाधुपारती होईल.

भाविकांना आवाहन

श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे समस्त विश्वस्त मंडळ व सेवेकऱ्यांनी केले आहे.

काय आहे मंदिराचे वेगळेपण? खानदेशची भूमी गौरवान्वित करणारे हे मंदिर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे श्री मंगळग्रह देवांची विश्वातील एकमात्र स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीशेजारीच भूमीमातेची दाक्षिणात्य शैलीतील एकमेव मूर्ती आणि पंचमुखी हनुमानजींची मूर्ती आहे. तसेच परिसरात भगवान श्री गुरुदत्त-माता श्री अनघालक्ष्मी यांच्या मूर्ती असलेले कमंडलूस्थित आणि भगवान श्री कालभैरव-माता भैरवी यांचे त्रिशूलात्मकस्थित विश्वातील एकमात्र मंदिर आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीटेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश पुढील बातमी →विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर पालकांचे मंथन; विक्रमी उपस्थितीत शिक्षक-पालक सभा

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!