Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

पत्रकाराच्या तक्रारीवरून न्यूज चॅनल संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

पत्रकाराच्या तक्रारीवरून न्यूज चॅनल संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
ईश्वर रामदास महाजन 12 Oct 2026, 02:56 1.1K views अपडेटेड 26 Oct 2026, 01:59 3 min read
🔧 साधने:
पत्रकाराच्या तक्रारीवरून न्यूज चॅनल संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
थोडक्यातपत्रकाराच्या तक्रारीवरून न्यूज चॅनल संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर येथील ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक तथा दैनिक ‘शौर्य मराठी’चे तालुका प्रतिनिधी अजय भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचे संपादक राजकुमार छाजेड यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

अजय भामरे यांच्या तक्रारीनुसार, माहितीच्या अधिकारातून माहिती मिळविल्याच्या कारणावरून राजकुमार छाजेड यांनी कथितरीत्या जातिवाचक शब्दांचा वापर करून शिवीगाळ व धमकी दिली. तसेच, आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याचेही भामरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी यापूर्वी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे सांगितले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३५१(२) व ३५२, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(p), ३(१)(q), ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीतील आरोपांच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीजुनी पेन्शनच्या हक्कासाठी पुन्हा एल्गाराची तयारी! , जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या सहविचार सभेत आंदोलनाची दिशा निश्चित; ‘जुनी पेन्शन’ हाच अंतिम निर्धार पुढील बातमी →नियमित योगाभ्यासातून निरोगी जीवनशैलीचा मंत्र; अमळनेरमध्ये योगवर्गांच्या नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू! , योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगनिद्रेच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष मार्गदर्शन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!