धरणगाव मोठा माळीवाडा परिसरात " नवमतदार नोंदणी कॅम्प " चे आयोजन ! , तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांची माळीवाडा परिसरात सदिच्छा भेट !

धरणगाव प्रतिनिधी -( पी डी पाटील)
धरणगाव प्रतिनिधी- शहरातील मोठा माळीवाडा परिसरातील यादी भाग क्रमांक १९८ फुलहार गल्ली येथे धरणगाव निवडणूक शाखा अंतर्गत १० ऑक्टोबर २०२६ शनिवार रोजी "नव मतदार नोंदणी कॅम्प " चे आयोजन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पी डी पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते.सदर नोंदणी कॅम्प येथे धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सदिच्छा भेट दिली.माळीवाडा परिसरातील मतदारांची संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी यादी भाग क्रमांक १९८ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पी डी पाटील यांनी नवनियुक्त मतदारांचे ६ नंबर फॉर्म भरून घेतले. मतदार नोंदणी दुरुस्ती फॉर्म नंबर ८ भरले व मयत मतदार यांचे ७ नंबर फॉर्म भरून नाव कमी करण्यात आले.याप्रसंगी एस आय आर च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारांच्या नोटिसांचे वितरण करण्यात आले होते त्यांचे कागदपत्रे जमा करण्याचे काम केले.याबाबत तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी बी एल ओ पाटील यांना मार्गदर्शन करत सोप्या पद्धतीने मतदारांचे फॉर्म भरण्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.मतदारांना मार्गदर्शक सूचना करूत संवाद साधला .
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...