भोंदू बाबा मनोहर मामा भोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष रामदास झोळ आणि माया झोळच्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई अघोरी पूजेचे आमिष, लैगिक छळ, बलात्कार आर्थिक लूट; तपासात २४ आरोपी निष्पन्न

सोलापूर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहर मामा भोसले आणि त्याचे साथीदार तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष रामदास झोळ त्याच्या पत्नी टोळीविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कठोर कारवाई केला आहे. या प्रकरणामुळे अघोरी पूजा, लैगिक छळ, बलात्कार भोंदूगिरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
मनोहर मामा भोसले च्या सांगण्यावरून भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात रोख रक्कम घेणे, ऑनलाइन पद्धतीने पैसे स्वीकारणे तसेच त्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे आणि प्रत्यक्षात हा पैसा वापरून तो कायदेशीर करून देणारे अशा स्वरूपाचे एकूण २४ आरोपी तपासात निष्पन्न झाले आहेत.
तपासात रामदास झोळ आणि माया झोळची दत्तकला शिक्षण संस्था नावाची संस्था असल्याचे समोर आले. संस्थेतील नोकरांच्या मदतीने आरोपी मनोहर भोसले च्या सांगण्यावरून संघटित गुन्हेगारी केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
या माध्यमातून पीडित नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून रोख रक्कम घेतली जात होती. त्यानंतर ही रक्कम दत्तकला शिक्षण संस्थेत नेऊन तिचे कायदेशीरकरण करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कायदेशीर स्वरूप दिलेली ही रक्कम पुन्हा मनोहर मामा यांना पुरवली जात असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या संघटित गुन्हेगारी कृत्यांमुळे सोलापूर ग्रामीण तसेच पुणे जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टोळीतील सदस्यांवर वेळोवेळी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
मात्र मनोहर मामा भोसले याला पूर्वीच्या एका गुन्ह्यात अटक होऊनही तो जामिनावर बाहेर आल्यानंतर कथित गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवत होता. या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवून त्याने स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या टोळीच्या कथित संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राचे रंजन कुमार शर्मा यांच्याकडे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्कामधील कलमांचा अंतर्भाव करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास करमाळा उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अघोरी पूजेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांचा इशारा गरीब आणि गरजू नागरिकांना खोट्या व अघोरी पूजेचे आमिष दाखवून त्यांच्याकडून आर्थिक लूट करणाऱ्या मनोहर मामा भोसले आणि त्याचा प्रमुख साथीदार रामदास झोळ च्या कथित कृत्यांना आळा घालण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी कठोर कारवाई केली आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...