Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

कायदा, सायबर सुरक्षा व महिला सुरक्षिततेवर जनजागृती धनदाई महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती सप्ताहाची सांगता

ईश्वर रामदास महाजन 06 Oct 2026, 14:02 991 views अपडेटेड 17 Oct 2026, 02:49 5 min read
🔧 साधने:
कायदा, सायबर सुरक्षा व महिला सुरक्षिततेवर जनजागृती धनदाई महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती सप्ताहाची सांगता

अमळनेर प्रतिनिधी :

अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताहभर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कायदा, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षितता या विषयांवर आयोजित जनजागृती कार्यक्रमाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमात अमळनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कविता ठाणगे यांनी विद्यार्थ्यांना महिलांविषयक विविध कायदे, महिला सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी तसेच संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कार्यरत असलेल्या ‘दामिनी पथका’ची माहिती दिली. विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रसंगाला घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने त्याचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अरविंद वानखेडे यांनी मोबाईल आणि इंटरनेटचा निष्काळजीपणे वापर केल्यास निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत तरुणाई अशा गुन्ह्यांच्या जाळ्यात कशी अडकते, याचे त्यांनी विवेचन केले. सोशल मीडिया, अनोळखी लिंक, बनावट संदेश आणि ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी केले.

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने आर्थिक साक्षरता विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. जितेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन, आर्थिक व्यवहारातील सुरक्षितता आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील आणि महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी नियोजन व आयोजनासाठी विशेष सहभाग घेतला. सप्ताहातील सर्व उपक्रमांना महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीअवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर , विभागीय बैठका आणि साप्ताहिक पाठपुराव्यावर भर; संघटित गुन्ह्यांत मोक्का लागू करण्याची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे. पुढील बातमी →अभिव्यक्ती मंच, विरारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्वितीय जन्मशताब्दी वर्षानिमित्त खुले काव्यसंमेलन उत्साहात , साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा काव्यमय जागर; कवी-कवयित्रींचा उत्स्फूर्त सहभाग

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!