Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

सातत्य आणि प्रामाणिक सेवेची पावती: शासकीय आश्रमशाळेच्या अधिक्षिका चारुशीला महाजन यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान

ईश्वर रामदास महाजन 05 Oct 2026, 16:03 1.1K views अपडेटेड 24 Oct 2026, 12:50 5 min read
🔧 साधने:
सातत्य आणि प्रामाणिक सेवेची पावती: शासकीय आश्रमशाळेच्या अधिक्षिका चारुशीला महाजन यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान

जळगाव प्रतिनिधी

आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय यावल अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या अधिक्षिका आयुष्यमती चारुशीला महाजन यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि समर्पित सेवेबद्दल ‘आदर्श अधिकारी कर्मचारी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित एका विशेष समारंभात त्यांना या पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले.

या गौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, मिलिंद पाईकराव व मुसळे सर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सहाय्यक आयुक्त (आदिवासी विकास, नाशिक) राजेंद्र हिवाळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

चारुशीला महाजन यांचा सेवाप्रवास अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक राहिला आहे. आदिवासी विकास विभागातील लेडीज (अधिक्षिका) पदाची जबाबदारी म्हणजे अत्यंत जोखमीचे आणि तारेवरची कसरत असणारे काम मानले जाते. २४ तास आणि ७ दिवस सेवेसाठी बांधील असणाऱ्या या पदावर कार्यरत असताना, चारुशीला यांनी पहिल्या दिवसापासून हॉस्टेलला आपले घर मानून निरंतर सेवा दिली आहे. त्यांनी आपल्या नोकरीची सुरुवात पिंगळवाडे आश्रमशाळेतून केली होती. सद्यस्थितीत त्या दहिवद येथे कार्यरत असून, आश्रमशाळेतील मुलींची पुरेपूर दक्षता आणि सुरक्षितता कशी घेतली जाईल, याकडे त्यांचा नेहमीच कटाक्ष असतो.

वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंगांना बाजूला सारून, त्यांनी कर्तव्य भावनेला नेहमीच प्राधान्य दिले. "नोकरी मिळणे सोपे पण ती प्रामाणिकपणे टिकवणे कठीण" हा वसा जपत केलेल्या कामाची दखल आज शासनाने घेतली आहे. त्यांच्या या यशात संदानशिव परिवाराचे आधारस्तंभ असणारे आई व दादा, तसेच समाजकार्याची आवड असणारे त्यांचे पती (जीवनसाथी) दीपक संदानशिव यांच्या खंबीर साथीचा मोठा वाटा आहे. आई-वडिलांनी सुनांना दिलेले स्वातंत्र्य आणि त्यांच्या शहाणपणाचा हा परिपाक असल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले.

हा बहुमान मिळाल्याबद्दल दहिवद शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन शिरसाट, सर्व शिक्षक वृंद आणि इतर कर्मचाऱ्यांकडून चारुशीला महाजन यांचे भरभरून अभिनंदन करण्यात येत आहे. परिवारातील सदस्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिळालेला हा सन्मान त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीसाठी प्रेरणादायी ठरेल. परिवर्तनवादी महामानव व महामातांच्या विचारांतून त्यांचा हा समाजकार्याचा वसा असाच पुढे सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीमैदान गाजले युवा खेळाडूंच्या जोशाने! ,अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; १४, १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंचा सहभाग पुढील बातमी →निपुण चाचणी, शैक्षणिक गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर ,देवगाव देवळी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उत्साहपूर्ण आयोजन; ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!