Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे मोहित पाटील यांचा जाहीर गुणगौरव , आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून उच्च पदावर निवड; वार्षिक सर्वसाधारण सभेत ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 10:24 887 views अपडेटेड 18 Oct 2026, 07:15 4 min read
🔧 साधने:
अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे मोहित पाटील यांचा जाहीर गुणगौरव   , आंतरराष्ट्रीय आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून उच्च पदावर निवड; वार्षिक सर्वसाधारण सभेत ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मान

अमळनेर प्रतिनिधी :

अमळनेर तालुका मराठा समाजाच्या वतीने चि. मोहित पंडित पाटील यांनी आंतरराष्ट्रीय नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर नोकरी मिळविल्याबद्दल त्यांचा जाहीर गुणगौरव करण्यात आला. रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत समाजाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी व कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत मोहित पाटील यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

चि. मोहित पंडित पाटील यांनी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अॅक्सेंचर (Accenture) या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत (MNC) सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून यशस्वीपणे नोकरी प्राप्त केली आहे. त्यांनी B.Tech. (पुणे) तसेच C-DAC (हैदराबाद) येथून उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या गुणवत्तेच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्यांनी मिळविलेले हे यश अमळनेर तालुका मराठा समाजासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.

मोहित पाटील हे प्रा. पी. के. पाटील, प्राचार्य तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ, अमळनेरचे माजी तालुका अध्यक्ष, आणि सौ. सीमा पी. पाटील, प्रथम महिला उपसरपंच, भिलाली, ता. अमळनेर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेतील गुणगौरव कार्यक्रमात समाज अध्यक्ष श्री. जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, खजिनदार एस. के. पाटील, महेंद्र बोरसे, सेक्रेटरी विक्रांत पाटील, जे. पी. पाटील, प्रा. पी. के. पाटील, चंद्रकांत काटे, संजय पुनाजी पाटील, गौरव उदय पाटील, एम.एस.ई.बी.चे पी. एस. पाटील, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, सुनील आहिरराव, प्रा. अशोक पवार आणि के. पी. पाटील यांच्या हस्ते मोहित पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

मोहित पाटील यांचे हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असून, शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविता येतो, याचे प्रेरक उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीशिव टेकडी येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण उत्साहात पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ‘हरित अमळनेर’साठी वृक्षसंगोपनाचा संकल्प पुढील बातमी →आ.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा शिक्षक हद्यसम्राट पुरस्काराने होणार विशेष गौरव, ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथे १ नोव्हेंबर रोजी सोहळ्याचे आयोजन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!