Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

अयोध्येपासून अयुत्थयापर्यंत ६,५०० किमीचा वारसा, मैत्रीचा प्रवास

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 08:45 951 views अपडेटेड 12 Oct 2026, 08:39 7 min read
🔧 साधने:
अयोध्येपासून अयुत्थयापर्यंत ६,५०० किमीचा वारसा, मैत्रीचा प्रवास

मुंबई प्रतिनिधी : भारत आणि थायलंडमधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने अयोध्येपासून अयुत्थयापर्यंत सुमारे ६,५०० किलोमीटरचा प्रस्तावित ‘त्रि-सेवा वारसा दुचाकी प्रवास २०२७’ आयोजित करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. भारत आणि थायलंडमधील राजनैतिक संबंधांच्या ८०व्या वर्धापनदिनाच्या (१९४७–२०२७) पार्श्वभूमीवर विकसित करण्यात येत असलेला हा उपक्रम वारसा, सांस्कृतिक पर्यटन, युवकांचा सहभाग आणि जनतेतील परस्पर संपर्क अधिक दृढ करण्यावर केंद्रित आहे.

या प्रस्तावाच्या संदर्भात उपक्रमाचे संकल्पनाकार व संयोजक राहुल लक्ष्मण पाटील आणि थायलंड समन्वयक अवनीश कबरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी बँकॉक येथील भारतीय दूतावासात भारताचे थायलंडमधील राजदूत महामहिम पुनीत अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी प्रस्तावित प्रवासाची संकल्पना, त्यामागील उद्दिष्टे आणि भारत–थायलंडमधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. बैठकीत वारसा व सांस्कृतिक राजनय, युवकांचा सहभाग, सांस्कृतिक पर्यटन आणि जनतेतील थेट संपर्क या विषयांवर चर्चा झाली.

प्रस्तावित प्रवासाची सुरुवात अयोध्येतून होऊन त्याचा समारोप अयुत्थया येथे होणार आहे. भारतातील सुमारे ६,५०० किलोमीटरचा हा प्रवास उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या सात राज्यांतून जाण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गावर बोधगया, वैशाली आणि सारनाथ यांसारख्या महत्त्वाच्या बौद्ध व सांस्कृतिक वारसा स्थळांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. थायलंडमधील टप्प्यातही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वारसा महत्त्व असलेल्या विविध स्थळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

या प्रवासामुळे महाराष्ट्रासह मार्गातील सातही राज्यांच्या विविधतेने नटलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शन घडविण्याची संधी मिळणार आहे. विविध प्रदेशांतील वारसा स्थळे, स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांना एका व्यापक भारत–थायलंड वारसा प्रवासाशी जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

या उपक्रमाची सांगड भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील प्राचीन सांस्कृतिक संबंध, बौद्ध वारसा, रामायण परंपरा आणि भारत–थायलंडमधील ऐतिहासिक मैत्री यांना या प्रवासात विशेष स्थान दिले जाणार आहे. वारसा संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे आणि युवकांना भारताच्या तसेच थायलंडच्या सामायिक वारशाशी जोडणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असेल.

या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी जनतेतील थेट संपर्क ही संकल्पना आहे. सामायिक इतिहास आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही देशांतील युवक, समुदाय आणि नागरिक यांच्यात संवाद वाढविणे, परस्पर समज निर्माण करणे आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे. मार्गावरील विविध ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे उपक्रम राबविण्याचीही संकल्पना आहे.

भारतीय आणि थाई त्रि-सेवा दलांच्या प्रतिनिधींच्या प्रस्तावित सहभागामुळे या प्रवासाला एक विशेष आयाम मिळणार आहे. मात्र या उपक्रमाचा मुख्य भर वारसा, संस्कृती, सांस्कृतिक पर्यटन आणि लोकसहभागावर राहणार आहे. उपक्रमाच्या संकल्पना विकास, विविध हितधारकांमधील समन्वय आणि संस्थात्मक संपर्काची जबाबदारी राहुल लक्ष्मण पाटील, संयोजक सांभाळत असून, थायलंडमधील समन्वयासाठी अवनीश कबरा सहकार्य करीत आहेत.

अयोध्या आणि अयुत्थया या दोन ऐतिहासिक नगरींना जोडणारा हा प्रस्तावित प्रवास केवळ दुचाकी मोहीम न राहता भारत आणि थायलंडच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचा, ऐतिहासिक नात्याचा आणि भविष्यातील मैत्रीचा संदेश देणारा उपक्रम ठरावा, अशी या संकल्पनेमागील भूमिका आहे.

‘वारशातून जोडूया मने, माणसांना जोडूया, राष्ट्रांना जोडूया’ या व्यापक दृष्टिकोनातून अयोध्येपासून अयुत्थयापर्यंतचा हा प्रवास भारत–थायलंड संबंधांमधील सांस्कृतिक, मानवी आणि युवा संपर्काला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात पुढील बातमी →म.वा.मंडळात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!