Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

ईश्वर रामदास महाजन 02 Oct 2026, 06:57 1.2K views अपडेटेड 23 Oct 2026, 01:04 5 min read
🔧 साधने:
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

जळगाव प्रतिनिधी

खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षिका सौ प्रतिभा लोहार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही राष्ट्रपुरुषांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याची, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, स्वच्छता आणि साधेपणा या मूल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला दिलेली दिशा, त्यांचे स्वदेशी व स्वावलंबनाचे विचार तसेच समाजातील प्रत्येक घटकाप्रती असलेली संवेदनशीलता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गांधीजींच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सत्य, अहिंसा, शिस्त, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा अंगीकार करण्याची प्रेरणा घेतली.

तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे, प्रामाणिकपणाचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि राष्ट्रसेवेचे जीवन विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या प्रेरणादायी घोषणेचा अर्थ स्पष्ट करताना देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांचे आणि देशाच्या अन्नसुरक्षेसाठी शेतकऱ्यांचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. अत्यंत साधे जीवन जगत देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शास्त्रीजींच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनमूल्यांचा आपल्या आचरणात अंगीकार करण्याचा निर्धार केला. सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिस्त, श्रमप्रतिष्ठा, साधेपणा आणि देशसेवा या मूल्यांवर आधारित उत्तम नागरिक घडविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे केवळ स्मरण न करता ते आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीआंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत 'इकरा थीम' कॉलेजचे यश; जळगाव विभागात अजिंक्यपद पटकावले! पुढील बातमी →अयोध्येपासून अयुत्थयापर्यंत ६,५०० किमीचा वारसा, मैत्रीचा प्रवास

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!