ढेकू रस्त्यावर पुन्हा बिबट्याची एन्ट्री!

अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरालगत बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढली आहे. 😰🐆 शहरातील ढेकू रस्त्यावर गणेश देसले यांच्या शेताजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे.
🐐 बकऱ्या चारणाऱ्या नागरिकांना बिबट्या अचानक दिसला. त्यांनी सुरक्षित अंतरावरून त्याचा फोटो काढला. त्यानंतर बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याने तेथून धूम ठोकत ढेकू आणि गलवाडे रस्त्याच्या मध्यभागातून पुढे धाव घेतली. 🐆💨
📞 घटनेची माहिती मिळताच गणेश देसले यांनी तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी वनपाल गुलाब पिंजारी यांना माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. 🌳👮♂️
🚨 पिंपळे रोड ते ढेकू रोड परिसरात सतर्कतेचा इशारा!
बिबट्याच्या दर्शनामुळे पिंपळे रोड, ढेकू रोड, पोलीस स्टेशन, आयटीआय कॉलेज परिसर तसेच लगतच्या शेतवस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 😨🐆
⚠️ नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
🔴 एकटे शेताकडे जाऊ नका.
🔴 रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्या.
🔴 लहान मुले व पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नका.
🔴 बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नका.
🔴 फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करू नका.
🔴 तातडीने पोलिस किंवा वनविभागाला माहिती द्या. 📞🚨
🐆 बिबट्याचा नेमका वावर कोणत्या दिशेने आहे, याचा वनविभागाकडून शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 🙏
🚨 सावध राहा… सुरक्षित राहा! 🚨
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...