डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन
1 min read

डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन

Loading

डिजिटल सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये जनजागृती; Anti-Fraud App चे अँक्टिवेशन

जळगाव प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत नागरिकांना सतर्क करण्यासाठी सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, जळगाव येथे ८ सप्टेंबर रोजी सायबर सिक्युरिटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात स्टाफ आणि पेशंटना विविध सायबर फ्रॉडबाबत माहिती देण्यात आली. फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद कॉल्स आणि लिंक ओळखण्याचे मार्ग तसेच सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास कोणती तातडीची पावले उचलावीत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे Quick Heal Foundation तर्फे विकसित Anti-Fraud App चे अॅक्टिवेशन. उपस्थितांच्या मोबाईलमध्ये अॅप सक्रिय करून त्याचा वापर आणि डिजिटल सुरक्षेसाठी त्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

डॉ. पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात सायबर वॉरियर विद्या सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी डॉ. आर. बी. आमले सरांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *