साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी:साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 14 ऑगस्ट वार गुरुवार रोजी हर घर तिरंगा अंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात आले . कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव आदरणीय श्री . संदीप घोरपडे सर अध्यक्षस्थानी होते . व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . दिलीप पाटील सर यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात तिरंगाच्या प्रवासातील विविध टप्पे व कोणत्या ठिकाणी तिरंगा फडकवला हे सांगितले . दहावी ब ची नेहा राकेश पाटील या विद्यार्थिनी वंदे मातरम ह्या देशभक्तीवर गीताचा दीडशे वर्षांचा इतिहास सांगितला तसेच विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली व वैदर्भी पवार – दहावी ब च्या विद्यार्थिनीने स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला . आठवी ब ची हिताक्षी भदाणे या विद्यार्थीनीने देशभक्तीपर भाषण सादर केले . शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी आपल्याला स्वातंत्र मिळवण्यासाठी किती क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिली ते सांगितले . अध्यक्षस्थानी भाषणात संस्थेचे सचिव श्री घोरपडे सर यांनी स्वातंत्र्यसंग्राम व विविध क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून दिला. हर घर तिरंगा अंतर्गत शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा व तिरंगा रॅली काढण्यात आली कार्यक्रम यशस्वीते साठी श्री मुकेश पाटील सर यांनी काम पाहिले.

