NEET पेपरफुटीविरोधात NSUI आक्रमक; अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ,दोषींवर कठोर कारवाईसह निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशीची मागणी
![]()
NEET पेपरफुटीविरोधात NSUI आक्रमक; अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
दोषींवर कठोर कारवाईसह निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशीची मागणी
अमळनेर प्रतिनिधी
NEET परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी NSUIच्या वतीने अमळनेरचे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र पेपरफुटी व गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होत असेल, तर तो कदापि सहन केला जाणार नाही, अशी भूमिका NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रमुख मागण्या
– NEET पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
– पेपरफुटीमागील संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी करावी.
– दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी.
– संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक व वेळबद्ध चौकशी करावी.
– विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये.
या वेळी NSUI जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष उमेश संदानशीव, अमळनेर शहर अध्यक्ष जयेश सुभाष पाटील, प्रभारी NSUI प्रविण पाटील यांच्यासह भगवान संदानशिव, पप्पू भिल पाटील, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, निलास भिल, अशोक पाटील, कृष्णा चौधरी, करण भिल, निंबाजी भिल तसेच अमळनेर काँग्रेस कमिटीचे भगवान सूर्यवंशी, संदीप घोरपडे, मनोज पाटील, शम्भीलाल भागवता, महेश दगडू पाटील, राजेंद्र वाघुडे, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, अशोक पवार, गजेंद्र वानखेडे, गोपक बोरसे यांच्यासह NSUIचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी NSUIचा संघर्ष सुरूच राहणार असून, NEET पेपरफुटीतील प्रत्येक दोषी कायद्याच्या कक्षेत आला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

