ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थी व कल्याण मधील मुख्याध्यापकांचा सत्कार*
![]()
*ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्यार्थी व कल्याण मधील मुख्याध्यापकांचा सत्कार* ====================== *
ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने कल्याण शहर आणि ग्रामीण मधील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, 90% पेक्षा जास्त रिझल्ट लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार, आणि सेवा निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या हस्ते, शारदा विद्या मंदिर कल्याण या ठिकाणी आयोजित केला होता. याप्रसंगी ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री गणेश पाटील सर, बाल भवन चरणी रोड चे संचालक आणि शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री प्रशांत भामरे सर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री प्रवीण लोंढे सर, कल्याण तालुक्याचे अध्यक्ष श्री गुलाबराव पाटील सर, उपाध्यक्ष श्री पानसरे सर, श्री भानुदास मडके सर, श्री अजित कांबळे सर, श्री अनिल पाटील सर, श्री शिंगोले सर ,उगलमुगले सर, बेंडाळे सर, जगेसर, ठाकूर सर, श्री अनंत केनगे, सुषमा देशमुख, चौधरी सर, दीपक भंडारे सर व कल्याण मधील अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते*

