मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी
![]()
मुंबई विद्यापीठातील उच्च दर्जाचा खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येईल: डॉ. मनोज रेड्डी
मुंबई:ठाणे(मनिलाल शिंपी) मुंबई विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची ५ वी कार्यशाळा “श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, कासारवाडी सावर्डे डेरवण चिपळूण येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या कार्यशाळेत सादर केले आहेत. सर्व खेळाडूंची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रणाली कार्यान्वित केली असून त्यामध्ये खेळाडूच्या संपूर्ण डाटा अपडेट होईल व कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही किंवा खेळापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण नियोजनबद्ध योजना आखली आहे. स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना 70 टक्के निधी ऍडव्हान्स देण्याची देखील तरतूद त्यांनी केली आहे त्यामुळे स्पर्धा अत्यंत चांगल्या आणि निर्विवाद पद्धतीने पार पडतील अशी त्यांनी मत व्यक्त केले. मुंबई विद्यापीठ क्रीडा समितीचे सदस्य बी एन एन कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.चंद्रकांत म्हात्रे यांनीही ओपन फोरम मध्ये बोलताना सांगितले की कुस्ती या खेळामध्ये ग्रीको रोमन प्रकाराचा समावेश करावा त्यासाठी विद्यापीठाला वेगळा खर्च देण्याची गरज भासणार नाही असे आश्वासन दिले.
फिजिओथेरपिस्ट डॉ.गणेश गाढवे यांनी खेळाडूने कशा प्रकारे आपले फिटनेस कायम ठेवले पाहिजे व कोणता व्यायाम आणि योगासने करावीत,तसेच कधी केव्हा कोणता थेरपी घ्यावा याबाबत प्रॅक्टिकल सह सखोल मार्गदर्शन केले
सर्व महाविद्यालयातील क्रीडा संचालकांना स्वतःच्या आरोग्यासह आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंचे आरोग्य फिटनेस व चैतन्य कसे टिकून राहील यासाठी योगा, फीजीओथेरपी, व्यायामाचे प्रकार याबाबत सखोल अशी माहिती व प्रॅक्टिकल सह माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेत सर्व क्रीडा संचालकांना देण्यात येत आहे. आपल्या संघासोबत फिजिओथेरपिस्ट असणे गरजेचे आहे. मसाज करण्यासाठी अद्यावत पद्धत उपयोगात आणणे आवश्यक आहे.
कितीही बीजी असलात तरी दिवसातून ३/४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. खेळाडूंना खेळात कायम टिकून राहण्यासाठी नियमित व्यायाम, योगसाधना, आणि अद्यावत अनुभवी थेरपी घ्यावी. Statik streching, क्रोम रोलिंग,थेरपी घ्यावी असे सांगितले.
कार्यशाळेचा ओपन फोरम मध्ये बऱ्याच किरा संचालकांनी क्रीडा स्पर्धा विषयी आपापले मत व्यक्त केले, स्पर्धेमध्ये असोसिएशनच्या सहभाग नसावा, तसेच मुंबई विद्यापीठा अंतर्गत प्रत्येक खेळाच्या रेफ्रि कार्यशाळा घेऊन स्वतंत्र क्रीडा संचालकांना पंच म्हणून कर्तव्य करण्याची संधी द्यावी म्हणजे कोणत्याही प्रकारचे होणार नाही असे मत काहींनी व्यक्त केले. शेवटी मुंबई विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांनी स्पष्ट सूचना केली की यापुढे स्पर्धेचा ठिकाणी खेळाडूंसोबत क्रीडा संचालक उपस्थित राहणे आवश्यक आहे,क्रीडा शिक्षक नसतील तर खेळाडूंना संधी देण्यात येणार नाही असे सांगितले.यावेळी विद्यापीठ क्रीडा समिती सदस्य जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रा.रोहिणी डोंबे,बी एन एन कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ.चंद्रकांत म्हात्रे, प्रा.राहुल अकुल, ठाणे झोन चे सचिव प्रा.गणेश मोरे, झोन ४ चे सचिव प्रा.शशांक उपशेटे, प्रा.मंदार कुलकर्णी,प्रा. लक्ष्मण इंगळे, डॉ. यज्ञेश्वर बारगाव, प्रा. पवळे सर,प्रा. डॉ. मनिलाल शिंपी,
झोन १ चे सचिव डॉ. मनोज वर्मा प्रा.उमेश सोनवणे , डॉ.प्रा.आदित्य कुलकर्णी ,प्रा.राजगुरू सर, प्रा.बालाजी सूरोसे,यांच्यासह बहुतेक क्रीडा संचालक यांनी चर्चा सत्रात आपले मत व्यक्त केले. मैदांगन या स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी फोरम चा माध्यमातून खेळाचे नियोजन उत्कृष्ट व खेळ दर्जेदार होण्यासाठी त्याचे ऑनलाइन प्रणालीद्वारे मूल्यांकन करणे आवश्यक आहे याबाबत प्रॅक्टिकल सह सखोल माहिती मार्केटिंग अधिकारी सुक्रीत सरकार यांनी दिली.
डॉ.मानसी सतालकर यांनी खेळाडू निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी डिजिटल घड्याळ कसे उपयुक्त आहे याबाबत ऑनलाइन प्रेझेंटेशन सादर केले. क्रीडा संचालकांचा मनातील विविध प्रश्नांचे समर्पक मार्गदर्शन केले.

