मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन च्या वतीने अंध दिव्यांग बांधवांना मिष्टान्न भोजन व रेशन किटचे वाटप! डॉ.मनिलाल शिंपी यांचे निस्वार्थ समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी- डॉ.यशवंत सोरे रंजल्या गांजल्यांसाठी मदतीचा हात देणारे आमचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन-डॉ.किशोर पाटील
![]()
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन च्या वतीने अंध दिव्यांग बांधवांना मिष्टान्न भोजन व रेशन किटचे वाटप!
डॉ.मनिलाल शिंपी यांचे निस्वार्थ समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी- डॉ.यशवंत सोरे
रंजल्या गांजल्यांसाठी मदतीचा हात देणारे आमचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशन-डॉ.किशोर पाटील
कल्याण.दि.२९ (प्रतिनिधी)
“मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा” या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत अंध दिव्यांग व अपंग बांधवांसाठी रेशन किट वाटप व मिष्टान्न भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिम येथील बेतुरकर पाडा परिसरातील अपंग विकास महासंघ कार्यालयात हा उपक्रम उत्साहात पार पडला.
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, चंद्रानंद कृषी पणन संस्थेचे अध्यक्ष व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समाजसेवक उद्योजक तथा ठाणे जिल्हा भाजपा क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत महादु सोरे, स्वामीनारायण मंदिर हॉलचे संचालक डॉ. दिनेशभाई ठक्कर यांच्या शुभहस्ते अंध दिव्यांग बांधवांना रेशन किटचे वितरण करण्यात आले.
रेशन किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, खाद्यतेल, कोकोनट ऑइल, साबण, कोलगेट, बिस्किटे, कांदे-बटाटे, पोहे, साखर, चहा, तूरडाळ, मुगडाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना भाजी-पुरी, आमरस व पुलाव भाताच्या मिष्टान्न भोजनाची मेजवानी देण्यात आली.
यावेळी एक्स्प्रेस ग्रुपच्या सौ. मधुबेन ठक्कर, जायंटस् ग्रुप ऑफ सहेली कल्याण मिडटाऊनच्या अध्यक्षा उर्वशी गुप्ता, डिंपल ताई, भिवंडी आरएसपी-एनसीसी प्रमुख निलेश नरवडे, रोटी डे ग्रुपच्या डॉ. वर्षा राठोड, नूतन ज्ञानमंदिरचे मुख्याध्यापक रमाकांत पाटील, रविंद्र बारापात्रे तसेच इच्छामणी भजनी मंडळाच्या संगिता पष्टे, आशाताई पडवळ, राणेताई, पवार ताई, पाटील ताई, पांचाळ ताई, अखिल भारतीय शिंपी समाज कलामंडळाचे उपप्रमुख रविंद्र नेरपगार, सचिव अरविंद शिंपी, प्रवीण भांडारकर, माजी अध्यक्ष किशोर बागुल, प्रा. प्रकाश माळी, शिक्षक गोकुळ गवळे, पत्रकार यशवंत महाजन, सौ. माया चव्हाण, जागृत रिपोर्टर चे संपादक अफसर खान, भिवंडी सत्यवार्ताचे संपादक लवलेश सुतार व आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी डॉ. मनिलाल शिंपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अपंग विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अशोक भोईर यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत डॉ. मनिलाल शिंपी यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
मंदिरात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा जेणेकरून मनाला आत्मिक समाधान मिळेल अशा प्रकारचे कार्य आमच्या फाउंडेशनचे अध्यक्ष
डॉ. मनिलाल शिंपी करत आहे म्हणूनच डॉ.मनिलाल शिंपी यांचे निस्वार्थ समाजकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे समाजसेवक डॉ.यशवंत सोरे यांनी सांगितले.तसेच
यावेळी बोलताना डॉ. किशोर बळीराम पाटील म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही निस्वार्थ भावनेने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत. कोणाचाही वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवून आत्मिक समाधान मिळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच रंजल्या गांजल्यांसाठी मदतीचा हात देणारा आमचा मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा फाउंडेशन आहे.असे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या सर्व सभासदांनी तसेच इतर संस्थांच्या सभासदांनी देखील विशेष मेहनत घेतली.

