नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध  , संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात
1 min read

नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध , संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात

Loading

नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डिगंबर मराठे, व्हाइस चेअरमनपदी सुरेश धनगर बिनविरोध

संचालक मंडळाच्या उपस्थितीत निवड जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार उत्साहात

 

मांडळ |प्रतिनिधी

नूतन मांडळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या., मांडळ या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. डिगंबर हिंमतराव मराठे तर व्हाइस चेअरमनपदी श्री. सुरेश दगा धनगर यांची दि. १७ जून २०२६ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सुनिल महाजन यांनी, तर सचिव म्हणून श्री. रविंद्र हिंमत पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. निवड जाहीर होताच नवनियुक्त चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा निवडणूक निर्णय अधिकारी, सचिव आणि संचालक मंडळाच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रभावी व लोकाभिमुख कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *