SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी,  मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन
1 min read

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन

Loading

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी

मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेस मंगळवार, ३० जूनपासून प्रारंभ झाला असून, ही मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूरजी भंगाळे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.

क्षेत्रभेटीदरम्यान BLO प्रत्यक्ष मतदारांच्या संपर्कात जाऊन गणना प्रपत्र अचूकपणे भरून घेत आहेत का, कामकाजात कोणत्या अडचणी येत आहेत, तसेच मतदारांना आवश्यक माहिती योग्य प्रकारे दिली जात आहे का, याची त्यांनी बारकाईने पडताळणी केली. यावेळी उद्भवणाऱ्या समस्यांवर आवश्यक सूचना व मार्गदर्शन करत SIR मोहिमेची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे हे क्षेत्रात काम करत असताना प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची अचानक पाहणी केली. त्यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेतले तसेच त्याची एक प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली.

या पाहणीनंतर प्रांताधिकारी भंगाळे यांनी BLO यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. मतदारांपर्यंत अचूक, पारदर्शक व वेळेत सेवा पोहोचवून SIR मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *