अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन.
![]()
अन्यायकारक संचमान्यते विरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे २५जून रोजी नाशिक येथे धरणे आंदोलन.
जळगांव प्रतिनिधी
नुकताच राज्यातील शिक्षण विभागाद्वारा मागील शैक्षणिक वर्ष २०२५-२६चा संच मान्यता ड्राफ्ट जाहीर केला असून त्यानुसार विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचमधील विद्यार्थी संख्या २०वरुन ३० अथवा ४०करण्याचे नियोजन झालेले असून यामुळे विज्ञान शाखेतील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरणार आहेत. या अन्यायकारक संचमान्यता ड्राफ्टमुळे तिन्ही शाखेतील विशेषता: कला शाखेतील हजारो पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ, घड्याळी तासिका होणार असल्याने राज्य महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ.प्रा.संजय शिंदे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रस्तावित संच मान्यतेविरोधात धरणे आंदोलन करण्याचे नियोजन झालेले असून त्या अनुषंगाने येत्या २५ जून रोजी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. राज्य शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून “मागेल त्याला स्वयंअर्थसहित कनिष्ठ महाविद्यालय” सुरू करण्याची परवानगी दिल्याने राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून त्यात भरीस भर म्हणून की काय विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय नकारात्मक असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या नगण्य प्रतिसादमुळे कला शाखेतील शिक्षकांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ते मोठया प्रमाणावर अतिरिक्त होणार आहेत. राज्य शासन प्रचलित पद्धतीने संच मान्यता न देता नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ड्राफ्टनुसार संच मान्यता लादतच असेल तर नाईलाजास्तव शासनाविरोधात राज्यातील कनिष्ठ महाविद्यालीन शिक्षक तीव्र आंदोलन करून शैक्षणिक कामकाज बंद पाडतील. शासनाने याची त्वरित गंभीर दखल घेऊन संच मान्यता ड्राफ्ट स्थगित करून प्रचलित पद्धतीनेच नव्या संचमान्यता द्याव्यात.अन्यायकारक ड्राफ्टमुळे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून “आता नाही तर कधीच नाही” हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व उ.मा.वि/क.म. वि. शिक्षकांनी येत्या २५जून रोजी मोठया संख्येने नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालय,नाशिक येथे सकाळी ठीक ११.०० वाजता स्वयं प्रेरणेने उपस्थित राहावे आणि राज्य विधी मंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यातील सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी या संदर्भात शासनास लक्षवेधीद्वारे प्रचलित पद्धतीनेच संच मान्यता देण्यास भाग पाडावे असे आवाहन जळगाव जुक्टो संघटनेच्यावतीने प्रा.नंदन वळींकार, प्रा.सुनील सोनार, प्रा. सुनील गरुड,प्रा.डी.डी.पाटील, डॉ.अतुल इंगळे, प्रा.शैलेश राणे, प्रा.डी.जे.चिकटे, प्रा.गजानन वंजारी,प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.

