के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न*
1 min read

के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न*

Loading

*के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात ज्ञानप्रबोधिनी पुणेचे ‘मैत्री शिबिर’ उत्साहात संपन्न*

जळगाव, दि. २३ जून २०२६ : के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय ‘मैत्री शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आले होते. दिनांक २२ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिराची आज यशस्वी सांगता झाली. शिबिरात एकूण ८३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाभिमुख दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात विविध उपक्रम, चर्चासत्रे, खेळ, प्रात्यक्षिके आणि समूहकार्य यांचे आयोजन करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शिका श्रीमती मानसी बोडस यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती सुधा रहाणे, श्रीमती अंजली भिडे, श्रीमती केतकी दीक्षित, श्रीमती भारती गोडबोले आणि श्रीमती सारिका अमळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
हे शिबिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती प्रतिभा लोहार यांचेही विशेष सहकार्य लाभले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी हे शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसमोर ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्याव्रत’ ही संकल्पना मांडण्यात आली. ज्ञान, शिस्त, परिश्रम, स्वावलंबन आणि मूल्याधिष्ठित जीवन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. तसेच ‘स्वयंविकासातून समाजविकास’ ही भूमिका विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्येकाने स्वतःच्या विकासाबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा यावेळी देण्यात आली.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय मूल्यांची ओळख करून देण्यात आली. वक्तशीरपणा, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव, समाजात आकस्मिक निर्माण होणाऱ्या अडचणींचा धैर्याने सामना करण्याची क्षमता तसेच समाजोपयोगी नागरिक म्हणून स्वतःची भूमिका कशी पार पाडावी याबाबत विविध कृतींमधून मार्गदर्शन करण्यात आले. विविध बौद्धिक सत्रे, प्रेरणादायी खेळ आणि समूहचर्चांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देण्यात आली.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांचे तीन गट तयार करून त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात आले. या गटकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव, कर्तव्यभावना, सहकार्याची वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देश, समाज आणि स्वतःबद्दल जागरूकता निर्माण करून आदर्श, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडविण्याचे कार्य या शिबिरातून प्रभावीपणे साध्य झाले.
या शिबिराचे नियोजन श्रीमती दिपाली खडके, श्रीमती प्रतिभा नेहेते आणि श्रीमती रत्नमाला शिंदे, यांनी केले. दोन दिवसांच्या शिबिराचे यशस्वी आयोजन, व्यवस्थापन आणि समन्वयासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या सांगता समारंभात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, मनोगते आणि शिबिरातून मिळालेल्या प्रेरणादायी शिकवणींचे कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रत्नमाला शिंदे यांनी प्रभावीपणे केले.
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासाची पेरणी करणारे हे दोन दिवसीय ‘मैत्री शिबिर’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *