दहावी पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर १६ जूनपासून परीक्षा; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन
1 min read

दहावी पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर १६ जूनपासून परीक्षा; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन

Loading

दहावी पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर

१६ जूनपासून परीक्षा; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन

अमळनेर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या जून-जुलै २०२६ दहावी (एसएससी) पुरवणी परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. प्रताप हायस्कूल, अमळनेर (केंद्र क्रमांक ३७१०) येथे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार असून परीक्षेला १६ जूनपासून प्रारंभ होत आहे.

परीक्षा केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून ही परीक्षा कॉपीमुक्त अभियानांतर्गत काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी येताना मूळ हॉलतिकीट व वैध ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.

तसेच परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० ते ४५ मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्राध्यक्ष सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे सर्व नियम पाळून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *