रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी,  प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड
1 min read

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी, प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड

Loading

रोबो क्वेस्ट स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्णकामगिरी

प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार ; कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांची इस्रो भेटीसाठी निवड

अमळनेर प्रतिनिधी: पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा रिसर्च सेंटर, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रोबो क्वेस्ट प्रतियोगिता स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे शाळेचे प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांना “बेस्ट प्रिन्सिपल” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये पी.बी.ए. इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संगणक व रोबोटिक्स क्षेत्रातील अभिनव प्रयोग सादर करत आपली वेगळी छाप उमटवली.

इयत्ता दहावीतील विद्यार्थी कार्तिक शिसोदे व कौस्तुभ शिसोदे यांनी सादर केलेल्या आधुनिक संगणकीय प्रयोगांना राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

विशेष म्हणजे, आगामी काळात अवकाशात स्थापित होणाऱ्या सॅटेलाईट प्रकल्पावेळी या दोन्ही विद्यार्थ्यांची इस्रोच्या स्पेस सेंटरला तीन दिवसीय विशेष भेटीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत.

तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील हिने डॉ. होमी भाभा एज्युकेशनतर्फे आयोजित स्पर्धात्मक परीक्षेत जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवत शाळेचा गौरव वाढविला. तिचाही मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे प्रधानाचार्य जे. एस. देवरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रेरणा व परिश्रम असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेले शैक्षणिक मार्गदर्शन आणि नवोपक्रमशील विचारसरणीमुळे शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याबद्दल त्यांनाही “बेस्ट प्रिन्सिपल” हा बहुमान प्रदान करण्यात आला.

या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, प्रधानाचार्य जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. एस. अमृतकर, स्वाती माळी, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, योगिता पाटील, सविता पवार तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *