शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय
1 min read

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय

Loading

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्तांशी सकारात्मक चर्चा

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाचे शिष्टमंडळ सक्रिय

मुंबई प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या वतीने मा. सचिंद्रप्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्यासमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चर्चेत रखडलेले पगार, संच मान्यता, अतिरिक्त शिक्षक समायोजन तसेच उपसंचालक व शिक्षणाधिकारी कार्यालयातील कामकाजातील अडचणी आदी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी शिक्षकांच्या विविध प्रशासकीय व आर्थिक समस्यांकडे महामंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. अनेक शिक्षकांचे पगार रखडले असून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तसेच संच मान्यतेसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत मा. शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी लवकरच महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महामंडळासोबत स्वतंत्र बैठक घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

बैठकीस माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सेक्रेटरी एस. डी. भिरुड तसेच महामंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या या चर्चेमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *