कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर
1 min read

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर

Loading

कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा; धनश्री चौधरी बनल्या डॉक्टर

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी म्हणजे कु. धनश्री चौधरी यांनी Bachelor of Dental Surgery (BDS) ही दंतवैद्यकीय पदवी यशस्वीरित्या संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच धुळे येथील ACPM Dental College मध्ये आयोजित भव्य पदवीदान समारंभात त्यांना अधिकृतरीत्या पदवी प्रदान करण्यात आली.
कु. धनश्री या कळमसरे येथील स्वर्गीय छगन माणकू चौधरी यांच्या नात असून मुंबई येथे Ramniranjan Jhunjhunwala College, घाटकोपर येथे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. रमेश छगन चौधरी व सौ. ममता रमेश चौधरी यांची कन्या आहेत. शैक्षणिक वातावरण आणि संस्कारांची भक्कम पार्श्वभूमी लाभलेल्या धनश्री यांनी लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य, मेहनत आणि शिस्त यांचा आदर्श ठेवत शिक्षणाची वाटचाल केली.
दंतवैद्यकीय शिक्षण हे अत्यंत कठीण आणि संयमाची परीक्षा घेणारे क्षेत्र मानले जाते. मात्र अथक परिश्रम, चिकाटी, आत्मविश्वास आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाच्या जोरावर धनश्री यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्या कळमसरे गावातील पहिल्या महिला BDS डॉक्टर ठरल्या असून संपूर्ण गावासाठी त्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.
त्यांच्या यशामुळे चौधरी परिवारासह संपूर्ण कळमसरे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून शिक्षणाच्या माध्यमातून उच्च यश प्राप्त करू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण धनश्री यांनी घालून दिले आहे.

धनश्री यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक, हितचिंतक तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *