महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन
1 min read

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

 महात्मा फुले हायस्कूल, देवगाव-देवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) :
देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये दि. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल महाजन यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.

कार्यक्रमास शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम साधेपणाने पण प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *