पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न
1 min read

पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

Loading

पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयात संयुक्त जयंती महोत्सव निमित्त चित्रकला स्पर्धा संपन्न

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विचारधारा प्रशाळेतर्फे क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६ निमित्त पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी एकूण 57 स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयावर चित्र काढून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. या वेळी विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे, क्रांतीसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव-२०२६चे समन्वयक प्रा. डॉ. अनिल डोंगरे आणि पी. एम. श्री केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य सोना कुमार उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषीक कु. पाटील हितेश्री यांना,द्वितीय पारितोषीक कु. मराठे अर्णव सुरेश यांना तर तृतीय पारितोषीक कु. सोनवणे जयश्री सुंदरलाल यांना मिळाले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. प्रदीप लक्ष्मण गोफणे आणि कु. प्रीती अशोक सोजवळ यांनी तर समन्वयक म्हणून प्रा. मोईन शेख यांनी काम पहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *