जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन*
1 min read

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन*

Loading

*जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन*

*जळगाव, दि. 07 (जिमाका) — :* भारत सरकारच्या जनगणना २०२७ प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी फिल्ड ट्रेनर्सचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मा. संचालक, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील ग्रामीण व शहरी भागासाठी १२० तसेच जळगाव शहरासाठी १७ अशा एकूण १३७ फिल्ड ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे येथील “यशदा” कार्यशाळेतून येथे प्रशिक्षण घेऊन आलेले अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. प्रशिक्षण प्रत्येकी ४० फिल्ड ट्रेनर्सच्या बॅचनुसार आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे सत्र दररोज सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत होत असून दि. ६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव येथील सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तर दि. ९ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत अल्पबचत भवन बैठक हॉल तसेच जळगाव शहर महानगरपालिका येथील बैठक सभागृहात प्रशिक्षणाचे पुढील सत्र आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, उपमुख्याधिकारी यावल नगर परिषद आर. के. डांगे, तहसीलदार बोदवड ज्ञानेश्वर सपकाळे तसेच शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख हर्षल किशोर नेमाडे हे मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन करीत आहेत.

या प्रशिक्षणाद्वारे जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना प्रक्रिया अचूक व परिणामकारकरित्या राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत असल्याची माहिती जणगणना शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *