शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”
1 min read

शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”

Loading

“शिक्षण, मानवता आणि सकारात्मकतेचा दीपस्तंभ : आबासाहेब गोकुळ पाटील यांच्या आज ६४व्या वाढदिवसानिमित्त व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास”

अमळनेर प्रतिनिधी :
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवणारे, साधेपणा आणि मानवतेची कास धरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले मा. केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ पाटील (रामेश्वरकर) यांचा आज, बुधवार दि. २५ मार्च २०२६ रोजी ६४वा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून समाजाच्या सर्व स्तरांवर जाणवतो.

आबासाहेब पाटील हे नाव अमळनेर तालुक्यात आदराने घेतले जाते. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी ज्या-ज्या पदांवर कार्य केले, त्या प्रत्येक पदाला त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा, निष्ठा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन ठळकपणे दिसून येतो.

जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन “माणूस” या मूल्याला सर्वोच्च स्थान देणारे आबासाहेब हे खऱ्या अर्थाने मानवतेचे उपासक आहेत. समाजात एकी निर्माण करणे, माणसं जोडणे आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. “जशी दृष्टी तशी सृष्टी” या तत्त्वावर विश्वास ठेवत ते प्रत्येक व्यक्तीतील चांगुलपणा ओळखून त्याला प्रोत्साहन देतात.

त्यांची नेतृत्वशैलीही तितकीच प्रभावी आहे. टीमवर्कच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करून घेण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. एखाद्याची चूक लक्षात आल्यास ते त्याला सार्वजनिकरित्या न दुखावता प्रेमाने समजावून सांगतात, तर चांगल्या कार्याचे कौतुक चारचौघात करून प्रेरणा देतात. त्यामुळेच त्यांच्या सहवासात असलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते.

आबासाहेबांचा विनम्र आणि निगर्वी स्वभाव, सुसंवाद साधण्याची शैली आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने वागण्याची पद्धत यामुळे ते समाजप्रिय व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. गावकी, भावकी, नातेसंबंध आणि समाजात त्यांना विशेष मान आहे. कोणत्याही अडचणीत असलेल्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.

विशेष म्हणजे, त्यांच्या विचारांची आणि व्यक्तिमत्त्वाची ताकद अशी आहे की तीन पिढ्यांतील लोकांशी त्यांचे स्नेहबंध घट्ट आहेत. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या विचारांचा आदर करतो. त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांना नवनवीन सकारात्मक विचारांची जणू मेजवानीच मिळते.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांची समाजातील सक्रियता तितकीच उल्लेखनीय आहे. विविध कार्यक्रम, सण-उत्सव आणि समारंभांमध्ये त्यांना आदराने निमंत्रित केले जाते. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांमधून ते शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगतात की, “आयुष्यातील दिशा आणि दशा उज्ज्वल करायची असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे.”

शैक्षणिक प्रोत्साहनासाठी ते दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहित करतात. विशेष म्हणजे, हे कार्य ते कोणताही गाजावाजा न करता निःस्वार्थ भावनेतून करतात.

आबासाहेब पाटील हे केवळ एक शिक्षक किंवा अधिकारी नसून, ते चालते-बोलते “ज्ञानपीठ” आणि समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. मित्र म्हणूनही ते आदर्श आहेत—सुखात सोबत आणि दुःखात पुढे असणारे.

अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे, अशीच सर्वांच्या मनातील भावना व्यक्त होत आहे.

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

🎂💐🎂🎂🎂🎂

लेखक

— श्री. हरिश्चंद्र शिवराम कढरे
मा. ग्रेडेड मुख्याध्यापक व लेखक, अमळनेर (जि. जळगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *