श्री मंगळग्रह मंदिरात झाले 51 फुटी महामंगल गुढीपूजन  अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात झाले 51 फुटी महामंगल गुढीपूजन अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा

Loading

 

श्री मंगळग्रह मंदिरात झाले 51 फुटी महामंगल गुढीपूजन

अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दि. 19 मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त सकाळी साडेसातच्या सुमारास 51 फूट उंचीची महामंगल गुढी उभारण्यात आली. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या शुभ हस्ते विधिवत गुढीचे पूजन झाले.
याप्रसंगी शंखनाद व प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाचा जयघोष करण्यात आला.
सुरूवातीला आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांना आवाहन करून मूर्तीवर मंत्रोपचाराच्या माध्यमातून विधिवत अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर 51 फुटी गुढीची विधिवत पूजा-अर्चा करून आकर्षक पद्धतीने ती सजविण्यात येऊन नैवेद्य दाखविण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्र तसेच श्री मंगळग्रह भगवंतांचा जयघोष केला. त्यानंतर गुढी उभारण्यात आली. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य यांनी मुख्य पौरोहित्य केले. त्यांना गणेश जोशी, अतुल दीक्षित, हेमंत गोसावी व उमेश पाठक यांनी सहकार्य केले.
यावेळी अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, कृषक पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा, सचिव डॉ. बेरीदम गुणाकर, भूमी सुपोषण अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक नवल रघुवंशी आदींसह मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो

अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिरात गुरुवारी सकाळी गुढी उभारण्यापूर्वी आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांना आवाहन करून मूर्तीवर मंत्रोपचाराच्या माध्यमातून विधिवत अभिषेक पूजा करताना अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे. शेजारी अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोजभाई सोलंकी, कृषक पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा, सचिव डॉ. बेरीदम गुणाकर, भूमी सुपोषण अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक नवल रघुवंशी आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *