अनिल म्हस्के यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र ‘पॅटर्न’ ठरला जगात अव्वल..! उपक्रम, संघटनात्मक बांधणी आणि पंचसूत्री अंमलबजावणीचा ‘महाराष्ट्राच्या शिरपेचात’ मानाचा तुरा
1 min read

अनिल म्हस्के यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड महाराष्ट्र ‘पॅटर्न’ ठरला जगात अव्वल..! उपक्रम, संघटनात्मक बांधणी आणि पंचसूत्री अंमलबजावणीचा ‘महाराष्ट्राच्या शिरपेचात’ मानाचा तुरा

Loading

अनिल म्हस्के यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र ‘पॅटर्न’ ठरला जगात अव्वल..!

उपक्रम, संघटनात्मक बांधणी आणि पंचसूत्री अंमलबजावणीचा ‘महाराष्ट्राच्या शिरपेचात’ मानाचा तुरा

मुंबई  प्रतिनिधी

अगोदर बुलढाणा, नंतर महाराष्ट्र आणि मग भारत या सगळ्या पॅटर्नवर जागतिक पातळीवर पोहोचलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’’व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या, संस्थेच्या भारत देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांनी अनिल म्हस्के पाटील यांना पत्र देऊन ही निवड घोषित केली.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात अनिल म्हस्के यांचा गौरवही करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये ‘बुलढाणा पॅटर्न’ आणि देशात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ यशस्वी ठरल्यानंतर, संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला अधिक मजबूत करण्याचे काम म्हस्के यांनी टीम सोबत केले आहे. पत्रकार आणि पत्रकारिता शाबूत राहावी, यासाठी अनिल म्हस्के आणि त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य टीमने हाती घेतलेले उपक्रम मैलाचा दगड ठरले आहेत.
अनिल म्हस्के यांचा गेल्या चार वर्षांतील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी पहिल्यांदा बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली, त्यानंतर विदर्भ विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण अध्यक्ष आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर अतिशय भावूक होत अनिल म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एका जिल्हाध्यक्षापासून सुरू झालेला हा प्रवास आज राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचला, याचे संपूर्ण श्रेय संघटनेच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीला आणि माझ्या सहकाऱ्यांच्या अहोरात्र कष्टाला जाते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने मला केवळ पद दिले नाही, तर पत्रकारांच्या हितासाठी लढण्याची ताकद दिली. आगामी काळात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ संपूर्ण देशात राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी नवीन उंची गाठण्याचा माझा मानस आहे.”
या निवडीवर बोलताना आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला म्हणाले की, “अनिल म्हस्के यांचे संघटन कौशल्य आणि कामाची गती अफाट आहे. महाराष्ट्रात त्यांनी ज्या पद्धतीने तळागाळातील पत्रकारांना एकत्र केले, ते पाहूनच त्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीला मोठी चालना मिळेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
‘व्हॉईस ऑफ मीडिया’’व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी म्हस्के यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “अनिल म्हस्के म्हणजे कर्तृत्व आणि निष्ठेचा संगम आहे. बुलढाणा ते महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास प्रत्येक पत्रकार पदाधिकारी यांच्यासाठी कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे. संघटनेची ‘पंचसूत्री’ त्यांनी ज्या प्रभावीपणे राबवली, त्यामुळेच आज महाराष्ट्राचा डंका वाजत आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच भारताच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना होईल.”
या निवडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार पदाधिकारी वर्गातून अनिल म्हस्के पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

__________________________________
फोटो ओळ : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’’व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या संस्थेच्या भारत देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांनी अनिल म्हस्के पाटील यांना पत्र देऊन ही निवड घोषित केली.
_______________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *