मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!*  *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.एच. पाटील शाळेत शिबिराचे आयोजन; ३६ कुटुंबांचा सहभाग*
1 min read

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!* *जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.एच. पाटील शाळेत शिबिराचे आयोजन; ३६ कुटुंबांचा सहभाग*

Loading

*मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!*

*जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.एच. पाटील शाळेत शिबिराचे आयोजन; ३६ कुटुंबांचा सहभाग*

*जळगाव दि. 17 (प्रतिनिधी) :* शासनाच्या आदेशानुसार जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहरुण परिसरातील एल.एच. पाटील शाळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ओळखपत्र, प्रमाणपत्र व विविध योजना लाभ मोहिमेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

मेहरुण तलावाजवळील वस्तीतील नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत आणि विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराच्या प्रास्ताविकात जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून शासनाच्या या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिबिरात विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून काही त्रुटी राहिल्यास पुन्हा शिबिर आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार रुपाली काळे यांनी माहिती देताना सांगितले की, निराधार महिलांना शासनाकडून दरमहा १५०० रुपये व दिव्यांग निराधारांना २५०० रुपये अनुदान दिले जाते. पात्र महिलांनी या शिबिरात नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात सुमारे ३६ कुटुंबांनी सहभाग नोंदविला. विविध १० कक्षांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात आले. तसेच तलाठी, मनपा आरोग्य अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व अनुलोम संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *