रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था*
1 min read

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था*

Loading

*रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था*

जळगाव प्रतिनिधी
रावसाहेब रुपचंद विद्यालय, जळगाव येथील दहावीचा विद्यार्थी आजारी असतानाही शिक्षणाबद्दलची जिद्द दाखवत रुग्णालयातूनच परीक्षा देऊन सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
दि. 16 मार्च 2026 रोजी केंद्र क्रमांक 3000, जळगाव येथे इयत्ता दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना केंद्रावर असलेल्या सेंट लॉरेन्स (S 1516044) शाळेतील विद्यार्थी नाते तुषार भरत सपकाळे याच्यावर शनिवारी (दि.14 मार्च) अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो सध्या जळगाव येथील वनिता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
विद्यार्थ्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष परवानगी घेण्यात आली. त्यानुसार केंद्र संचालकांच्या देखरेखीखाली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णालयातच विद्यार्थ्याला समाजशास्त्र विषयाची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका रुग्णालयात पोहोचवून सर्व नियमांचे पालन करून परीक्षा पार पडली.
यासाठी विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री. शुभम बोरसे तसेच विभागीय सचिव श्री. मोहन देशले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली.
आजारी अवस्थेतही शिक्षणाबद्दलची जिद्द आणि परीक्षा देण्याची विद्यार्थ्याची तयारी पाहून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. या प्रसंगामुळे विद्यार्थ्याच्या चिकाटीचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *