सरस्वती शाळेत स्नेहसंमेलन संपन्न ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार,डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा सन्मान
1 min read

सरस्वती शाळेत स्नेहसंमेलन संपन्न ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार,डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा सन्मान

Loading

सरस्वती शाळेत स्नेहसंमेलन संपन्न
ज्येष्ठ समाजसेवक , प्रवचनकार,डॉ. रवींद्र भोळे ह्यांचा सन्मान

उरुळी कांचन: नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचालित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर उरुळी कांचन येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणावर करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणारे मान्यवरांसह शिवाजी कांचन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संचालक उरुळी कांचन ना.स.पतसंस्था, सौ कोमल ताई कांबळे विद्यमान पंचायत समिती सदस्या, ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम काळे, कु. पूजा सणस अध्यक्ष भाजप महिला युवा आघाडी, बापूसो कदम, राजेंद्र बारंगुळे, पत्रकार सुनील तुपे, मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर व्यासपीठावर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर सर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन, राष्ट्रभक्तीपर गीते तसेच महाराष्ट्रातील लोकधारा गीते सादर केलीत. या कार्यक्रमाला संजय कुंजीर सर, किरण तळले सर, अमोल कुंजीर सर, सौ मनीषा मेमाणे,सौ स्मिता तोडकरी, सौ लता चव्हाण, कु.लीना धिवार , श्वेता देवरे, दिपाली बोडरे प्रामुख्याने उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कुंजीर सर, सौ मनीषा मेमाणे यांनी केले.हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *