आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त जळगावात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा उत्साहात*
![]()
*आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त जळगावात महिलांसाठी क्रीडा स्पर्धा उत्साहात*
जळगाव : दि ८ :- युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेरा युवा भारत केंद्र जळगाव तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ASMITA Khelo India उपक्रमांतर्गत ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता एम. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य प. वि. माध्यमिक शाळेच्या लेझीम पथकाने मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव, एनएसएस जळगाव विद्यापीठाचे संचालक राजू गवारे, योगा असोसिएशनच्या शरयू विसपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मल्लखांब, लाठीकाठी व विविध संरक्षणात्मक क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धा तीन वयोगटांत घेण्यात आल्या. त्यामध्ये १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा गटांचा समावेश होता. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींसह विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांची नोंदणी ‘अस्मिता खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत पोर्टलवर करण्यात आली होती. विजेत्या संघांना व स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पदके प्रदान करण्यात आली.
स्पर्धा संपल्यानंतर एम. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये विजेत्या स्पर्धकांना खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव यांच्या हस्ते बक्षिसे व पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी केले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कांचन विसपुते, विजय विसपुते, जितेंद्र शिंदे, सुमिधा सोनी, धीरज जावळे व नरेंद्र भोई यांनी काम पाहिले. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक आणि मेरा युवा भारत जळगाव केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेरा युवा भारतचे कार्यक्रम प्रमुख सुनील पंजे, साई संस्थेचे निलेश बाविस्कर, युथ क्लबचे नितीन नेरकर तसेच युवा स्वयंसेवक कमलेश सोनवणे व चेतन पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
१०० मीटर धावणे (१३ वर्षांखालील) – प्रथम शरण्या मनीष भंडारी, द्वितीय सारा निलेश अजनाडकर, तृतीय हर्षाली श्रीकांत राठोड.
१०० मीटर धावणे (१३ ते १८ वर्षे) – प्रथम मयुरी अनिल गायकवाड, द्वितीय माधुरी अनिल गायकवाड, तृतीय राजश्री राकेश कचरे.


१०० मीटर धावणे (१८ वर्षांवरील) – प्रथम माधुरी समाधान कोळी, द्वितीय ममता लक्ष्मण सूर्यवंशी, तृतीय कोमल श्याम पाटील.
१०० मीटर अंतिम फेरी – प्रथम निशा सत्यवान वारंगे, द्वितीय वैशाली दत्तात्रय चंदनकर, तृतीय दिपाली रवींद्र पाटील.
२०० मीटर धावणे (१३ वर्षांखालील) – प्रथम शरण्या मनीष भंडारी, द्वितीय प्रांजल प्रदीप पाटील, तृतीय मोहिनी संदीप चौधरी.
२०० मीटर धावणे (१३ ते १८ वर्षे) – प्रथम सिंड्रेला डॅनियल पवार, द्वितीय प्रेरणा विश्वनाथ बिचवे, तृतीय अनुत्तरा मनीष गुरसळ.
२०० मीटर धावणे (१८ वर्षांवरील) – प्रथम मनीषा भगवान पवार, द्वितीय ममता संतोष किरोते, तृतीय कोमल राहुल उमाळे.
४०० मीटर धावणे (१३ वर्षांखालील) – प्रथम सेजल कमलाकर मोरे, द्वितीय सारा निलेश अडणारकर, तृतीय श्रेया शिरीष गवाडे.
४०० मीटर धावणे (१३ ते १८ वर्षे) – प्रथम नंदिनी प्रेमसिंग बारेला, द्वितीय सिंड्रेला डॅनियल पवार, तृतीय अनघा राहुल पाटील.
फन गेम स्पर्धा :
संगीत खुर्ची (४५ वर्षांवरील) – प्रथम छाया तायडे, द्वितीय कामिनी धांडे, तृतीय अर्चना तायडे.
संगीत खुर्ची (३० वर्षे गट) – प्रथम जयश्री जगताप, द्वितीय विवेककिनी पाटील, तृतीय मयुरी पोरवाल.
रस्सीखेच स्पर्धेत जयश्री जगताप, मयुरा पोरवाल, मोनाली येवले, सुलक्षणा पुंडलिक व निशा वारंगे यांनी यश मिळवले.
चमचा-लिंबू स्पर्धेत प्रथम अर्चना तायडे, द्वितीय मयुरी पाटील व तृतीय निशा वारंगे ठरल्या.
बुक बॅलन्स स्पर्धेत आशा राजेश पवार, मंगला सचिन बोदवडे, छाया तायडे व सुलक्षणा पुंडलिक यांनी विजेतेपद पटकावले.
********

