जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान
1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त तामसवाडी येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ; आरोग्य सेविकांचा सन्मान

पारोळा प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तामसवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल मॅडम यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पाटीलडॉ. चेतन करोडपती, पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती मा. वसंतराव अर्जुन पाटील, तसेच तामसवाडी गावचे माजी सरपंच अनिल दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य सेविका श्रीमती मनीषा भरत पाटील (तामसवाडी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गावातील आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचाही सत्कार करून त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा देण्यात आला.

कार्यक्रमास सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक ताई, आशा सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *