पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन
![]()
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन
अमळनेर प्रतिनिधी : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर व शाळेच्या प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विज्ञानाचे महत्त्व, प्रयोगातून शिक्षण घेण्याची गरज आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित आकर्षक व माहितीपूर्ण प्रकल्प सादर केले. त्यामध्ये स्वच्छ पर्यावरण मॉडेल, दिवस-रात्र मॉडेल, ज्वालामुखी मॉडेल, ऋतूंचे प्रकार दर्शविणारे मॉडेल, झाडे वाचवा संदेश फलक, पाण्याचे स्रोत, वनस्पती व प्राण्यांपासून मिळणारे अन्नाचे स्रोत, वनस्पतींची जीवन प्रक्रिया, बलाचे प्रकार, पोषक घटकांचे प्रकार, वायुमंडलाचे स्तर तसेच चंद्राच्या कला आदी विषयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रकल्प अत्यंत आत्मविश्वासाने सादर करून उपस्थितांना वैज्ञानिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
आपल्या मुलांचे प्रकल्प पाहण्यासाठी पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रात्यक्षिके दाखवून पालकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि वैज्ञानिक विचारसरणी अधिक दृढ झाली.
हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कुंजल पाटील मॅडम, उत्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी, सखाराम पावरा, उमेश पाटील आणि राजेंद्र पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. एकूणच, राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपर परंपरेची साक्ष देणारा ठरला.

